कोलकाता नाईट रायडर्ससाठी सर्वच खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. सांघिक कामगिरीच्या जोरावर कोलकाताने संपूर्ण हंगामात दमदार कामगिरी करत संघाला ट्रॉफी पटकावून दिली. अंतिम सामन्यात केकेआरच्या गोलंदाजांनी तर सनरायझर्स हैदराबादच्या विस्फोटक फलंदाजांवर अंकुश ठेवत त्यांना सामन्यात पुनरागमन करण्याची एकदाही संधी दिली नाही. या एकतर्फी विजयानंतर केकेआरच्या मोठ्या खेळाडूने एक निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

अंतिम सामन्यातीस केकेआरच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने मोठे वक्तव्य केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टार्कने आणखी फ्रँचायझी क्रिकेट खेळण्यासाठी एक फॉरमॅट वगळण्याचे संकेत दिले आहेत. स्टार्क हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू आहे. KKR ने आयपीएल २०२४ च्या मोसमासाठी २४.७५ कोटी रुपये खर्चून संघाला घेतले.

Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Ravichandran Ashwin Calls Sanju Samson Selfish After RR Captain Selected For T20 World Cup
“तो स्वार्थीपणे खेळतोय..”, अश्विनने संजु सॅमसनची विश्वचषकाच्या संघात निवड होताच केलं मोठं विधान; म्हणाला,”त्याची गरज..”
Sachin Tendulkar Son Arjun Tendulkar Aggression
२ चेंडूंवर, २ षटकार व सचिन तेंडुलकरच्या लेकाची माघार; अर्जुनला खुन्नस देणं पडलं महाग, MI vs LSG ची नाट्यमय ओव्हर पाहा
IPL 2024 Prize money updates in marathi
IPL 2024 Prize Money : जेतेपदानंतर कोलकाता टीम मालामाल, उपविजेत्या हैदराबादवरही पैशांचा पाऊस
Gautam Gambhir offered blank cheque by Shah Rukh Khan to be with KKR for 10 years
.. म्हणून गौतम गंभीरला शाहरुखने ब्लँक चेक दिला? BCCI मुळे केकेआरचं १० वर्षांचं गणित ‘असं’ बदलण्याच्या चर्चा
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!

हेही वाचा – IPL 2024: विराट कोहलीपासून ते नवख्या नितीश रेड्डीपर्यंत हे खेळाडू ठरले मोठ्या पुरस्कारांचे मानकरी, एका क्लिकवर पाहा यादी

राष्ट्रीय संघाशी असलेल्या बांधिलकीमुळे जवळपास दशकभर लीग न खेळणाऱ्या स्टार्कने त्याच्या वेळापत्रकात अधिक फ्रँचायझी क्रिकेटचा समावेश करण्यासाठी एक फॉरमॅट सोडण्याचे संकेत दिले आहेत. ३४ वर्षीय वेगवान गोलंदाजाने त्याला कोणते फॉरमॅट सोडायचे आहे हे सांगितले नाही. स्टार्क म्हणाला, “गेल्या नऊ वर्षांत मी निश्चितपणे ऑस्ट्रेलियन क्रिकेटला प्राधान्य दिले आहे. माझ्या शरीराला विश्रांती देण्यासाठी आणि क्रिकेटपासून दूर असलेल्या माझ्या पत्नीसोबत काही वेळ घालवण्याची संधी मिळावी यासाठी मी बहुतेक वेळेस या स्पर्धांपासून दूर राहिलो. त्यामुळे गेल्या नऊ वर्षांपासून माझे मन इथेच केंद्रित आहे.”

Mitchell Starc said, “I’m close to the end of my career. One format may drop off. I enjoyed my time in the IPL and look forward to coming back next year, possibly in Purple and Gold”. pic.twitter.com/KJ2FeEnASe— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 26, 2024

मिचेल स्टार्क पुढे म्हणाला, “मी निश्चितपणे माझ्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहे. एका आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमधून मी बाहेर पडू शकतो, कारण पुढच्या विश्वचषकापर्यंत अजून बराच वेळ आहे आणि मी या फॉरमॅटपासून दुर झालो तर फ्रँचायझी क्रिकेटसाठी दरवाजे उघडे होतील.”

हेही वाचा – Hardik Pandya: घटस्फोटाच्या चर्चा, वर्ल्डकप संघाबरोबरही नाही… विदेशात अज्ञातस्थळी एकटाच फिरतोय हार्दिक पंड्या?

पुढे स्टार्क म्हणाला, “मला पुढच्या वर्षीच्या वेळापत्रकाबद्दला माहीत नाही, पण मी यंदा पुरेपूर आनंद घेतला आहे आणि पुढच्या वर्षी परत येईन आणि केकेआरच्या जर्सीत पुन्हा दिसण्याची आशा आहे.” इतर अनेकांप्रमाणे स्टार्कनेही मान्य केले की इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे आयपीएलमध्ये मोठी धावसंख्या गाठली जात आहे आणि २७० सारखी मोठी धावसंख्या टी-२० विश्वचषकात दिसणार नाही. टी-२० विश्वचषकात फिरकीपटूंना आणखी मदतीची अपेक्षा असल्याचे तो म्हणाला.