Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Weather Update: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाचा दारूण पराभव केला. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी कब्जा करत क्वालिफायर १ मध्ये प्रवेश केला आहे. क्वालिफायर १ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना पंजाब किंग्जविरूद्ध होणार आहे. हा सामना २९ जून रोजी मुल्लानपूरमध्ये रंगणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल, त्या संघाला थेट अंतिम सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. तर पराभूत संघाला अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी मिळेल.

लखनऊला नमवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा क्वालिफायर १ मध्ये प्रवेश

लखनऊविरूद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. लखनऊच्या फलंदाजांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत २२७ धावांचा डोंगर उभारला.लखनऊकडून कर्णधार ऋषभ पंतने सर्वाधिक ११८ धावांची खेळी केली. या खेळीला तोडीसतोड उत्तर देत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार जितेश शर्माने नाबाद ८५ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने आपल्या संघाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला.

क्वालिफायर १ सामना रद्द झाला तर?

क्वालिफायर १ चा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये खेळवला जाईल. या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळणार आहे. तर हा सामना गमावणाऱ्या संघाला अंतिम फेरीत जाण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. मात्र, सामना रद्द झाल्यास पंजाब किंग्ज संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. कारण अशा स्थितीत गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या संघाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला क्वालिफायर २ चा सामना खेळावा लागेल.

प्लेऑफच्या सामन्यांसाठी राखीव दिवस असणार आहे का?

आयपीएलच्या प्लेऑफच्या सामन्यांसाठी राखीव दिवस आहे की नाही, याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, बदललेल्या नियमानुसार प्रत्येक अतिरिक्त १२० मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतरही सामन्याला सुरूवात होऊ शकते.

कसं असेल हवामान?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवामान खात्याने जो अंदाज व्यक्त केला आहे, त्यानुसार सामन्यावेळी वातावरण ३६ अंश सेल्सिअस इतकं राहू शकते. तर हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र या पावसाचा सामन्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. सामन्यावेळी ढगाळ वातावरण असू शकते.