Yashasvi Jaiswal Instagram Post for Rajasthan Royals: आयपीएल २०२५ आता अखेरच्या टप्प्यातून येऊन पोहोचली आहे. प्लेऑफचे चार संघही ठरले आहेत, तर ६ संघ स्पर्धेबाहेर झाले आहे. यापैकी राजस्थान रॉयल्सचा संघाचे गट टप्प्यातील सर्व १४ सामने झाले आहेत. यासह राजस्थान संघासाठी ही स्पर्धा संपली आहे. पण याचदरम्यान यशस्वी जैस्वाल राजस्थान रॉयल्सची साथ सोडणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

यशस्वी जैस्वाल राजस्थान रॉयल्सचा सर्वाेत्कृष्ट खेळाडू आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये ५०० पेक्षा जास्त धावा करणारा तो या फ्रँचायझीचा एकमेव खेळाडू आहे. पण मग लीग टप्प्यातील सर्व सामने संपल्यानंतर असं काय घडलं की यशस्वीने राजस्थान रॉयल्सचे आभार मानत एक क्रिप्टीक पोस्ट शेअर केली आहे. ज्यावरून तो फ्रँचायझीची साथ सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे.

यशस्वी जैस्वालच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टने खळबळ उडाली आहे. इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये त्याने राजस्थान रॉयल्सचे आभार मानले आहे. त्याने लिहिलंय, राजस्थान रॉयल्सचे सर्व गोष्टींसाठी आभार. आपल्याला हवा होता तसा हंगाम नव्हता, पण या प्रवासाबद्दल धन्यवाद. यशस्वी जैस्वालच्या या पोस्टने चर्चांना उधाण आलंय.

यशस्वीने राजस्थान रॉयल्सच्या जर्सीमधील पाठमोरा फोटो शेअऱ केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिलं, राजस्थान रॉयल्स सर्व गोष्टींसाठी तुमचे आभार. आपल्याला हवा तसा हा सीझन होता, पण या प्रवासासाठी कायमच कृतज्ञ राहीन. आता भविष्यातील पुढच्या आव्हानांकडे वळतो. असं म्हणत त्याने शेवट केला आहे. या पोस्टवरून यशस्वी पुढच्या मोसमात राजस्थानकडून खेळणार नसल्याची चर्चा रंगली आहे.

Yashasvi Jaiswal Instagram Post Before He Edit
यशस्वी जैस्वालची एडिट करण्यापूर्वीची इन्स्टा पोस्ट

यशस्वी जैस्वालची ही पोस्ट समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. जैस्वाल राजस्थान रॉयल्स सोडणार का, असा अंदाज सर्वजण लावत आहेत. काही नेटकऱ्यांच्या मते, यशस्वी ट्रेड विंडोमधून राजस्थानहून केकेआर संघात जाऊ शकतो का? अशा पोस्टही पाहायला मिळत आहेत.

यशस्वी जैस्वालने नंतर इन्स्टाग्रामवर केलेली पोस्ट नंतर ए़डिट केली आहे. यशस्वीची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तो रॉयल्स फ्रँचायझीची साथ सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण येताच त्याने बदल केला. यशस्वीने एडिट केलेल्या वाक्यामध्ये तो म्हणाला की, “आपल्याला हवा तसा हा सीझन नव्हता पण आपल्या या एकत्र प्रवासाचे मी कायमच आभार व्यक्त राहिन.”

View this post on Instagram

A post shared by Yashasvi Jaiswal (@yashasvijaiswal28)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यशस्वी जैस्वालने पोस्टमध्ये बदल केल्याने चर्चांना पूर्णविराम लागला. यशस्वीने या पोस्टमध्ये संघातील खेळाडूंबरोबर एकापेक्षा एक कमालीचे फोटो शेअर केले आहेत.