Yuzvendra Chahal Completes 200 IPL Wickets: मुंबई विरूद्ध राजस्थानमध्ये सुरू असलेल्या सामन्यात युझवेंद्र चहलने एक विकेट घेताच इतिहास रचला. आयपीएलच्या इतिहासातील एक मोठी कामगिरी त्याने आपल्या नावे केली आहे. चहलने मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यात मोहम्मद नबीची विकेट घेत आयपीएलमध्ये आपल्या २०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. गोलंदाजी करत असलेल्या चहलने गोलंदाजी करत स्वतच झेल टिपला आणि ही विकेट मिळवत इतिहास रचला. आयपीएलच्या इतिहासात २०० विकेट्स घेणारा युझवेंद्र चहल हा पहिला गोलंदाज ठरला आहे. चहलने आपल्या १५३व्या सामन्यातील १५२व्या डावात ही कामगिरी केली. त्याने ७व्या षटकात मोहम्मद नबीची विकेट घेत हा विक्रम आपल्या नावावर केला.
चहलच्या आधी गोलंदाजांनी ५०,१००,१५० विकेट्सचा टप्पा गाठला पण २०० विकेट्सपर्यंत कोणीच पोहोचू शकले नाही. पण शानदार फिरकीपटू असलेल्या चहलने ही मोठी कामगिरी आपल्या नावे कायम ठेवली आहे. इतकेच नव्हे तर फिरकीपटू म्हणून सर्वाधिक २०० विकेट्स घेणारा तो पहिला फिरकीपटू ठरला आहे. चेन्नईचा माजी गोलंदाज ड्वेन ब्राव्हो १८९ विकेट्ससह फिरकीपटूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तर मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू पीयुष चावला या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
५० विकेट्स: आरपी सिंग (१२ एप्रिल २०१०)
१०० विकेट्स: लसिथ मलिंगा (१८ मे २०१३)
१५० विकेट्स: लसिथ मलिंगा (६ मे २०१७)
२०० विकेट्स: युझवेंद्र चहल (२२ एप्रिल २०२४)
चहलने आपल्या १५३व्या सामन्यातील १५२व्या डावात ही कामगिरी केली. त्याने ७व्या षटकात मोहम्मद नबीची विकेट घेत हा विक्रम आपल्या नावावर केला. चहलने २०१३ मध्ये आयपीएल करिअरला सुरुवात केली. तिथे त्याला एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. ज्यात त्याने ३४ धावा दिल्या. यानंतर त्याने २०१४ मध्ये १४ सामने खेळले ज्यात त्याने १२ विकेट घेतल्या. यानंतर चहल ने मागे वळून पाहिले नाही. २०१५ मध्ये २३, २०१६ मध्ये २१, २०१७ मध्ये१४, २०१८ मध्ये १२, २०१९ मध्ये १८ आणि २०२० मध्ये २१ विकेट्स घेत त्याने आपल्या कामगिरीत प्रगती केली.
यानंतर चहलने २०२१ मध्ये १८, २०२२मध्ये २७ विकेट आणि गेल्या मोसमात २१ विकेट घेत अनेक महान गोलंदाजांना मागे टाकले. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ८ सामन्यात १३ विकेट घेतल्या आहेत. त्याचा आयपीएलमधील इकोनॉमी रेट ७.६९ आणि सरासरी २१.३९ आहे.