दुलीप ट्रॉफी २०२५ स्पर्धेला येत्या २८ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. तर या स्पर्धेतील अंतिम सामना ११ सप्टेंबरला खेळवला जाईल. ही स्पर्धा पुन्हा एकदा आधीसारख्या फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत ४ संघ खेळताना दिसतील. ही स्पर्धा कसोटी फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. शुक्रवारी या स्पर्धेसाठी ईस्ट झोन संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनकडे सोपवण्यात आली आहे.

ईस्ट झोनची जबाबदारी इशान किशनकडे

सध्या भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात ऋषभ पंत दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याची जागा भरून काढण्यासाठी इशान किशनला संपर्क केला गेला होता. पण तो दुखापतग्रस्त असल्याचं म्हटलं गेलं होतं. त्यामुळे ऋषभ पंतच्या जागी एन जगदीशनला संधी दिली गेली होती. आता इशान किशन फिट झाला असून तो आगामी दुलीप ट्रॉफी स्पर्धेत ईस्ट झोन संघाचं नेतृत्व करण्यासाठी तयार आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी करून तो भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या संघात झारखंडचा फलंदाज विराट सिंगला देखील संघात स्थान देण्यात आलं आहे.

या स्पर्धेत इशान किशन या संघाचं नेतृत्व करताना दिसेल. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी अभिमन्यू ईश्वरनकडे सोपवण्यात आली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर अभिमन्यू ईश्वरनला भारतीय संघात स्थान मिळालं होतं. त्याला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघात स्थान मिळालं, पण अजूनपर्यंत पदार्पण करण्याची संधी देण्यात आलेली नाही. आता दुलीप ट्रॉफी स्पर्धेत दमदार कामगिरी करून तो आपला ठसा उमटवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

या स्पर्धेसाठी असा आहे ई्स्ट झोनचा संपूर्ण संघ:

इशान किशन (यष्टीरक्षक/कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, संदीप पटनाईक, विराट सिंग, डेनिश दास, श्रीराम पॉल, शरणदीप सिंग, कुमार कुशाग्र, रियान पराग, उत्कर्ष सिंग, मनीषी, सुरज जैस्वाल, मुकेश कुमार, आकाशदीप, मोहम्मद शमी</p>

राखीव खेळाडू :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्तार हुसेन, आशीर्वाद स्वेन, वैभव सूर्यवंशी, स्वास्तिक सामल, सुदीप कुमार घरामी, राहुल सिंग