Jacques Kallis Statement on Jos Buttler: टीम इंडियाची रन मशीन विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हे एकदिवसीय क्रिकेटमधील आघाडीचे फलंदाज आहेत. यंदाचा विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत हे दोन्ही फलंदाज आपापल्या संघासाठी झटपट धावा करताना दिसतील. विराट कोहलीसाठी, येथे धावा काढण्याची शक्यता अधिक आहे. कारण तो हा विश्वचषक घरच्या मैदानावर खेळणार आहे, तर बाबरला देखील येथे चांगली कामगिरी करता येईल. कारण त्याला आशिया खंडातील परिस्थितीत कसे खेळायचे हे देखील माहित आहे. अशात जॅक कॅलिसने एक मोठं वक्तव्य केलं आहे.

जोस बटलरला भारतात खेळण्याचा मोठा अनुभव –

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस याला वाटत नाही की विराट-बाबर हे दोन फलंदाज आगामी विश्वचषकातील सर्वात यशस्वी फलंदाज असतील. यासाठी त्याने इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरची निवड केली आहे. जोस बटलर हा आक्रमक फलंदाज असून त्याला आयपीएलच्या माध्यमातून भारतात खेळण्याचा भरपूर अनुभव आहे यात शंका नाही.

New Zealand Announce T20 WC Squad With Special Guests in Unique Way
T20 World Cup साठी न्यूझीलंडकडून अनोख्या पद्धतीने संघाची घोषणा, IPL मधील ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
Kevin Pietersen's big statement on Sanju Samson
IPL 2024 : “जर मी निवडकर्ता असतो तर…”, इंग्लंडचा माजी दिग्गज केविन पीटरसनचे संजू सॅमसनबाबत मोठं वक्तव्य
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
Along with Wanderers Kingsmead Newlands will host 2027 World Cup matches sport news
वॉण्डरर्ससह किंग्जमीड, न्यूलॅण्ड्सला २०२७च्या विश्वचषकाचे सामने

कॅलिसने विराट कोहली आणि बाबर आझमचे घेतले नाही नाव –

आयसीसीशी बोलताना जॅक कॅलिस म्हणाला, “मला वाटते की या विश्वचषकात जोस बटलर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असेल. हा बाहेरचा कॉल आहे, पण मला त्याला या परिस्थितीत खेळताना बघायला आवडेल. त्याच्यासोबतच इंग्लंडचा विश्वचषकही शानदार असेल. मला वाटते की तो या विश्वचषकातील यशस्वी खेळाडूंपैकी एक असेल.”

जोस बटलरचा आयपीएलमध्ये राहिलाय दबदबा –

त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत ९६ सामने खेळले आहेत. येथे त्याने १४८.३२ च्या स्ट्राइक रेटने ३२२३ धावा केल्या आहेत. त्याने आयपीएल २०२२ मध्ये ४ शतकांसह १७ सामने खेळून ८६३ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याची आयपीएल टीम राजस्थान रॉयल्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली होती, जिथे त्यांना गुजरात टायटन्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.

हेही वाचा – Gautam Gambhir: ‘…म्हणून आजही २००७ च्या टी-२० विश्वचषकाबद्दल वाटते खंत’; गौतम गंभीरने केला खुलासा

भारतातील वनडे फॉरमॅटमध्ये बटलर ठरलाय फ्लॉप –

या अनुभवाला आधार मानून कॅलिस विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या या फलंदाजाबद्दल बोलत आहे. मात्र, भारतातील वनडे फॉरमॅटमधील बटलरचा विक्रम पाहिला, तर तो खूपच फिका आहे. त्याने येथे ८ एकदिवसीय सामन्यांमध्ये केवळ ८३ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सरासरी केवळ ११ आहे. पण कॅलिस या आकड्यांकडे लक्ष देत नाही आणि विश्वचषकात सर्वाधिक धावा तो करू शकेल असा विश्वास त्याला आहे. इंग्लंड संघ येथे आपले विश्वचषक विजेतेपद वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.