सध्या फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धेचा थरार सुरू आहे. कतारमध्ये सुरू असलेली ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रत्येक संघ पूर्ण ताकदीनीशी प्रयत्न करत आहे. मात्र स्पर्धेच्या १३ व्या दिवशी जपानच्या विजयामुळे जर्मनीचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. जपानने स्पेनच्या संघाचा २-१ ने पराभव केल्यामुळे जर्मनीचा संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला आहे.

हेही वाचा >>>>FIFA World Cup 2022 : गोलफरकामुळे मेक्सिकोचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

फिफा विश्वचषक स्पर्धेच्या १३ व्या दिवशी इ गटात स्पेनचा सामना जपानशी तर कोस्टारिकाचा सामना जर्मनीशी झाला. या दोन्ही सामन्यांत चांगलीच अटीतटीची लढत झाली. मात्र जपानने स्पेन संघावर विजय मिळवल्यामुळे जर्मनीचा संघ थेट स्पर्धेबाहेर फेकला गेला. जर्मननीने कोस्टारिका संघावर ४-२ असा मोठा विजय मिळवूनदेखील त्याचा काहीही उपयोग झाला नाही. जपानने स्पेनवर २-१ असा विजय मिळवला.

हेही वाचा >>>>FIFA World Cup 2022 : अर्जेटिनाची पोलंडवर मात; दोन्ही संघ बाद फेरीत

तीन मिनिटांत २ गोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जपानने स्पेनवर थरारक विजय मिळवला. पहिल्या डावात स्पेनने जपावर १-० अशी आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या डावात जपानने दमदार कामगीरी केली. जपानच्या खेळाडूंनी दुसऱ्या डावात ४८ आणि ५१ व्या मिनिटाला दोन गोल गेले. परिणामी धावफलक १-२ असा झाला. अवघ्या तीन मिनिटात जपानने दोन गोल केल्यामुळे स्पेनला पराभवाला सामोरे जावे लागले. या विजयासह जपानने बाद फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. तर जर्मनीचा संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला. जर्मनीने २०१४ साली विश्वचषक जिंकण्याची किमया केली होती. मात्र २०१८ साली हा संघ साखळी सामन्यांतच स्पर्धेबाहेर फेकला गेला होता.