२०२० वर्षात जानेवारी महिन्यात भारतीय संघ घरच्या मैदानावर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे. गेले काही महिने पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला जसप्रीत बुमराहने भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. मात्र या मालिकेआधी बुमराहला आपली शारीरिक तंदुरुस्ती सिद्ध करावी लागणार आहे. यासाठी बुमराह रणजी क्रिकेट सामन्यात खेळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुधवारी गुजरात विरुद्ध केरळ सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यात बुमराह गुजरातचे प्रतिनिधीत्व करणार आहे. निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद या सामन्याला हजर असणार आहेत. त्यामुळे या सामन्यात बुमराहच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेसाठी टीम इंडिया –

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषब पंत, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार) , शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत. केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jasprit bumrah to prove fitness in ranji trophy match against kerala psd
First published on: 24-12-2019 at 15:24 IST