ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन आणि जेश हॅझेलवूड पुढील महिन्यात होणाऱ्या बांगलादेश दौऱ्याला मुकण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यापासून न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजच्या मालिकेसाठी त्यांना विश्रांती देणार असल्याचे म्हटले जात आहे.
‘‘जॉन्सन आणि हॅझेलवूड यांच्यावर अतिरिक्त ताण येत असल्यामुळे त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. ऑस्ट्रेलियातील आगामी मोसमासाठी त्यांनी तयारी करणे अधिक गरजेचे आहे,’’ असे ऑस्ट्रेलिया संघाच्या कामगिरीचे मूल्यमापन करणारे व्यवस्थापक पॅट होवार्ड यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Sep 2015 रोजी प्रकाशित
बांगलादेश दौऱ्याला जॉन्सन, हेझलवूड मुकण्याची शक्यता
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन आणि जेश हॅझेलवूड पुढील महिन्यात होणाऱ्या बांगलादेश दौऱ्याला मुकण्याची शक्यता आहे
Written by रत्नाकर पवार
First published on: 04-09-2015 at 02:10 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jhonson hezalwood may not go to bangladesh