एका हरवलेल्या क्रिकेट रोलरमुळे भारतीय क्रिकेटपटू परवेझ रसूल आणि जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन (जेकेसीए) यांच्यात वाद उद्भवला आहे. जेकेसीएने रसूलला नोटीस बजावली आहे असून त्याला रोलर परत करण्यास अथवा पोलीस कारवाईसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. त्याच्या उत्तरात रसूलने रोलर चोरल्याचा आरोप फेटाळला आहे. “जम्मू -काश्मीर क्रिकेटला जीवन आणि आत्मा देणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूशी वागण्याचा हा मार्ग आहे का?”, असेही रसूलने असोसिएशनला विचारले.
जेकेसीए चालवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नियुक्त केलेल्या तीन सदस्यीय उपसमितीचा भाग असलेले भाजप प्रवक्ते ब्रिगेडियर (निवृत्त) अनिल गुप्ता यांनी एका ईमेलमध्ये लिहिले, “आमच्याकडे काही पुरावे आहेत का? आम्ही त्याला कशासाठी दोष देत आहोत.” रसूलला इतर प्रशासकांसह गुप्ताच्या ईमेलवर चिन्हांकित केले गेले. अनिल गुप्ता यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, ”हा मेल रसूलला पाठवला गेला, कारण सर्व जिल्हा संघटनांचे पोस्टल पत्ते उपलब्ध नव्हते आणि रसूलचे नाव त्याच्या जिल्ह्याच्या जेकेसीएच्या रजिस्टरमध्ये होते.”
हेही वाचा – कलरफूल जॅकेट अन् पिवळे केस..! IPLपूर्वी धोनीचा लूक ठरतोय ‘किलर’ हिट
परवेज रसूल हा अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा येथील रहिवासी आहे. जेकेसीएने प्रथम बिजबेहराच्या मोहम्मद शफीला आणि नंतर रसूलला दुसरी नोटीस पाठवली. गुप्ता म्हणाले, ”रसूलचे नाव रजिस्टरमध्ये त्याच्या रेकॉर्डमध्ये होते. आम्ही केवळ परवेज रसूललाच नाही, तर सर्व जिल्हा संघटनांना आणि ज्यांनी श्रीनगरमधून मशिनरी घेतली आहे त्यांनाही मेल पाठवला आहे. आम्हाला लेखापरीक्षण अहवाल तयार करायचा असल्याने आम्ही ही प्रक्रिया केली. अकाऊंट्सची देखभाल करणे आवश्यक आहे. आम्ही न्यायालयाच्या आदेशानंतर पदभार स्वीकारला, तेव्हा आम्ही पाहिले, की ही यंत्रसामुग्री उपलब्ध नाही.”
परवेझ रसूलचे उत्तर
परवेझ रसूलने २६ जुलै रोजी आपल्या उत्तरात लिहिले, “मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू परवेज रसूलने माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे, आयपीएल, दुलीप ट्रॉफी, देवधर ट्रॉफी, इंडिया ए, बोर्ड अध्यक्ष इलेव्हन, इराणी ट्रॉफी खेळलो आहे, गेली सहा वर्षे जम्मू-काश्मीर रणजी संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. मी बीसीसीआयकडून दोनदा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू पुरस्कार मिळवणारा जम्मू-काश्मीरमधील एकमेव क्रिकेटपटू आहेत. आज मला एक पत्र मिळाले आहे, की मी जेकेसीएकडून रोलर घेतला आहे, जे खरोखर दुर्दैवी आहे. मी स्पष्ट करतो, की मी जेकेसीएकडून कोणताही रोलर किंवा मशीन घेतलेले नाही. मी क्रिकेटर आहे. जम्मू-काश्मीर क्रिकेटला जीवन आणि आत्मा देणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूशी वागण्याचा हा मार्ग आहे का? आपल्याकडे सर्व जिल्ह्यांमध्ये संलग्न संस्था आहे; जर तुम्ही माझ्याऐवजी त्यांच्या जिल्ह्यात उपस्थित असाल, तर तुम्ही त्यांच्याकडून उपकरणे मागवा.”