Joe Root Record: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरमध्ये सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव ३५८ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना जो रूटने चांगली सुरुवात करून दिली. यादरम्यान त्याने कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तिसऱ्या दिवशी फलंदाजी करताना ३१ धावा करताच तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. यासह त्याने राहुल द्रविड आणि जॅक कॅलिससारख्या दिग्गज खेळाडूंना मागे सोडलं आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग दुसऱ्या स्थानी आहे. आता जो रूट या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. मात्र लवकरच तो रिकी पाँटिंगला मागे सोडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरू शकतो.
भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ३२९ डावात १५९२१ धावा केल्या आहेत. या दुसऱ्या स्थानी असलेल्या रिकी पाँटिंगच्या नावे १६८ डावात १३३७८ धावा करता आल्या आहेत. जो रूट लवकरच रिकी पाँटिंगला मागे सोडू शकतो. या यादीत चौथ्या स्थानी असलेल्या जॅक कॅलिसने १६६ डावात १३२८९ धावा केल्या आहेत. तर राहुल द्रविडच्या नावे १६४ डावात १३२८८ धावा करण्याची नोंद आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
सचिन तेंडुलकर – १५९२१ धावा
रिकी पाँटिंग – १३३७८ धावा
जो रूट – १३२९४ धावा
जॅक कॅलिस – १३२८९ धावा
राहुल द्रविड – १३२८८ धावा
ॲलिस्टर कूक – १२४७२ धावा
कुमार संगकारा -१२४०० धावा
ब्रायन लारा – ११९५३ धावा
मँचेस्टरमध्ये १००० धावा पूर्ण
यासह जो रूटच्या नावावर आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. रूटने मँचेस्टरच्या मैदानावर फलंदाजी करताना १००० धावा पूर्ण केल्या आहेत. याआधी त्याने लॉर्ड्सच्या मैदानावर सर्वाधिक २१६६ धावा केल्या आहेत. यासह इंग्लंडच्या २ मैदानांवर सर्वाधिक धावा करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.