Joe Root became the highest Test run scorer at Lord’s : इंग्लंडच्या जो रुटने गेल्या काही काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये इतकी दमदार कामगिरी केली आहे की, कसोटी क्रिकेटमध्ये सचिनचा सर्वाधिक धावांचा विक्रम जर कोणी फलंदाज मोडेल, तर तो रुटच असेल, असा विश्वास क्रिकेटविश्वातील प्रत्येकाला वाटतो. कारण रूट सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातील सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावत विक्रमांची रांग लावली आहे.

जो रूट इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा फलंदाज –

जो रूटने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या डावात १४३ धावांची खेळी केली होती. दुसऱ्या डावातही त्याने १०३ धावा केल्या आणि लंकेविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावली. त्याचे कसोटी क्रिकेटमधील हे ३४ वे शतक आहे. यासह तो इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू बनला आहे. त्याने ॲलिस्टर कुकचा विक्रम उद्ध्वस्त केला आहे. रुटने कसोटी क्रिकेटमध्ये ३४ शतके झळकावली आहेत. त्याचवेळी कुकने कसोटीत ३३ शतके झळकावली होती.

India vs Bangladesh 1st T20 Match highlights
IND vs BAN : सूर्याच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने फडकावली विजयी पताका, बांगलादेशचा ७ विकेट्सनी उडवला धुव्वा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
SL vs NZ 2nd Test match Kane Williamson surpasses Virat Kohli's record in Test
SL vs NZ : केन विल्यमसनने विराट कोहलीला मागे टाकत केला खास पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला १९वा खेळाडू
Dinesh Karthik reaction about Rishabh Pant and MS Dhoni
IND vs BAN : ऋषभ पंत कसोटीत धोनीपेक्षा सरस आहे का? दिनेश कार्तिकने दिले उत्तर, चाहत्यांना केले ‘हे’ आवाहन
IND vs BAN Shubman Gill fifth Test century against Bangladesh
IND vs BAN : शुबमनने शतक झळकावत भारताचा बाबर म्हणणाऱ्यांची बोलती केली बंद, भारताने बांगलादेशला दिले ५१५ धावांचे लक्ष्य
Rohit Sharma Became First Captain to Complete 1000 Runs in 2024 IND vs BAN 1st Test
IND vs BAN: रोहित शर्माने चेन्नई कसोटीत केला मोठा पराक्रम; २०२४ मध्ये ही कामगिरी करणारा ठरला पहिला कर्णधार
Virat Kohli chanted om namah shivay Gautam Gambhir listened Hanuman Chalisa
कोहलीने कोणत्या सीरिजमध्ये प्रत्येक चेंडूपूर्वी ओम नम: शिवाय म्हटलं? गंभीरसाठी हनुमान चालिसा कशी ठरली किमयागार?
Mitchell Starc on Virat Kohli about IND vs AUS Test Series
‘मला त्याच्याविरुद्ध खेळताना…’, मिचेल स्टार्कचे विराटबरोबरच्या स्पर्धेबाबत मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘आमच्या दोघात…’

इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारे फलंदाज:

  • जो रूट – ३४ शतके
  • ॲलिस्टर कुक – ३३ शतके
  • केविन पीटरसन- २३ शतके
  • वॅली हॅमंड – २२ शतके
  • कॉलिन कॉर्डरे – २२ शतके

जो रुट लॉर्ड्सवर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज –

जो रूट कसोटी क्रिकेटच्या इतिहासात लॉर्ड्सवर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. जगातील सर्व फलंदाजांना मागे टाकत त्याने पहिले स्थान मिळवले आहे. रुटने लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर २०१५ कसोटी धावा करण्याचा ग्रॅहम गूचचा विक्रम मोडीत काढला आहे. आता रूटने लॉर्ड्सच्या मैदानावर २०२२ कसोटी धावा केल्या आहेत. तसेच लॉर्ड्सवरील कसोटीच्या दोन्ही डावात शतके झळकावणारा जो रूट हा चौथा फलंदाज ठरला आहे.

लॉर्ड्सवर कसोटीच्या दोन्ही डावात शतके झळकावणारे फलंदाज –

  • १०६ आणि १०७ – जॉर्ज हॅडली (वेस्ट इंडीज) विरुद्ध इंग्लंड, १९३९
  • ३३३ आणि १२३ – ग्रॅहम गूच (इंग्लंड) विरुद्ध भारत, १९९०
  • १०३ आणि १०१* – मायकेल वॉन (इंग्लंड) विरुद्ध वेस्ट इंडीज, २००४
  • १४३ आणि १०३ – जो रूट (इंग्लंड) विरुद्ध श्रीलंका, २०२४