scorecardresearch

VIDEO: चेंडू चमकवण्यासाठी जो रुटने लढवली अजब शक्कल; चक्क! ‘जॅक लीचच्या…’

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात रावळपिंडी येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक असा नजारा पाहायला मिळाला. जो तुम्ही याआधी पाहिला नसेल.

VIDEO: चेंडू चमकवण्यासाठी जो रुटने लढवली अजब शक्कल; चक्क! ‘जॅक लीचच्या…’
चेंडू चमकवण्याचा प्रयत्न करताना रुट आणि लीच.(फोटो- लोकसत्ता ग्रफिक्स टीम)

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी येथे खेळला जात आहे. हा सामना अनिर्णित होण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. कारण पाकिस्तानने इंग्लंडच्या पहिल्या डावातील ६५७ धावांच्या प्रत्युत्तरात पहिल्या विकेटसाठी २२५ धावांची भागीदारी केली आहे. या सामन्याl जो रुटने चेंडू चमकवण्यासाठी अजब शक्कल लढवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

दरम्यान, या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात असा नजारा पाहायला मिळाला. जो तुम्ही याआधी क्वचितच पाहिला असेल. आपल्या सर्वांना माहित आहे की कोविडपासून, आयसीसीने चेंडू चमकवण्यासाठी लाळेच्या वापरावर बंदी घातली आहे. अशा स्थितीत क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज चेंडूला चमकवण्यासाठी काही ना काही मार्ग शोधत राहतात.

इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो चेंडूला चमकवण्यासाठी अनोखी पद्धत वापरताना दिसत आहे. होय, पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रूट जॅक लीचच्या डोक्यावर चेंडू घासून चमकवताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याचबरोबर तो पाहून चाहत्यांपासून ते समालोचकांनाही हसू आवरु शकले नाहीत.

हेही वाचा – IND vs BAN: वनडे मालिकेसाठी मोहम्मद शमीच्या बदली खेळाडूची घोषणा, ‘या’ गोलंदाजाला मिळाली संधी

लीचच्या डोक्याच्या प्रत्येक भागावर चेंडू घासून रूट घामाने चेंडू चमकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान जिमी अँडरसनही रुटजवळ उभा असल्याचा दिसत आहे. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. कारण याआधी क्वचितच कोणत्याही खेळाडूने चेंडू चमकण्यासाठी अशी अजब शक्कल लढवली असेल.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 13:49 IST

संबंधित बातम्या