भारताला पहिल्यांदा विश्वविजेता बनवणारे कर्णधार कपिल देव आणि त्या काळातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेली सारिका यांच्या अफेअरची चर्चा काही नवीन नाही. एका पार्टीत या दोघांची भेट झाली. रिपोर्ट्सनुसार दोघेही एकमेकांवर खूप जीवापाड प्रेम करायचे. पण अचानक कपिल यांचे रोमी भाटियाशी लग्न झाल्यानंतर हे नाते तुटले.

कपिल देव आणि सारिका यांच्या प्रेमाच्या चर्चांना त्यावेळी खूप उधाण आले होते. वृत्तांवर विश्वास ठेवला, तर कपिल सारिकाला त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पंजाबला घेऊन गेले होते. मात्र, नंतर कपिल यांनी आपला विचार बदलला आणि सारिकासोबत ब्रेकअप करून रोमी भाटियाचा हात हातात घेतला.

कपिल देव आणि अभिनेत्री सारिका यांची पहिली ओळख प्रसिद्ध अभिनेता मनोज कुमार यांच्या पत्नीने केली होती. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले. कपिल यांनी सारिकाला पंजाबला नेले आणि त्याच्या कुटुंबीयांशी भेट घालून दिल्याच्या बातम्याही आल्या होत्या. मात्र, काही दिवसांनंतर ते वेगळे झाल्याच्या आणि रोमी कपिलच्या आयुष्यात आल्याच्या बातम्या आल्या. कपिल-सारिका रोमीच्या येण्यानंतर वेगळे झाले होते.

सारिका आणि कमल हासन

हेही वाचा – दक्षिण आफ्रिकेहून विराटनं आईला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; Photo पाहून तुम्हीही म्हणाल, ‘‘किती गोड..!”

रोमी भाटियासोबत दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर कपिल देव यांनी १९८० मध्ये लग्न केले. या जोडप्याने १९९६ मध्ये अमिया नावाच्या मुलीला जन्म दिला. रोमी आणि कपिल देव यांची ओळख क्रिकेटपटू सुनिल भाटीया यांनी करुन दिली होती. सुनिल आणि कपिल देव हे एकदम जवळचे मित्र होते.

कमल हासन आणि सारिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिग्गज अभिनेते कमल हासन यांचे ७०च्या दशकात अभिनेत्री श्रीविद्यासोबत अफेअर होते. त्यानंतर १९७८ साली कमल हासन यांनी वाणी गणपतीसोबत लग्न केले. मात्र त्यांचा संसार १० वर्षे टिकला. त्यानंतर कमल हासन यांच्या आयुष्यात सारिकाची एण्ट्री झाली. कमल हासन आणि सारिका लिव्ह इनमध्ये राहू लागले होते. मात्र सारिका गर्भवती असल्याचे समजताच १९८८ मध्ये त्यांनी विवाह केला असल्याच्या चर्चा होत्या. त्यांना श्रृती आणि अक्षया या दोन मुली आहेत. कमल हासन यांनी २००४ मध्ये सारिकापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.