Kapil Dev Statement on Rohit-Virat Retirement: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचे दोन वरिष्ठ खेळाडू पूर्णपणे फेल ठरले. या दौऱ्यावरील खराब कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी विराट कोहली यांच्या भवितव्याबाबत चर्चा सुरूच आहे. रोहित आणि विराटने कसोटीतून निवृत्ती घ्यावी, अशा पोस्ट चाहत्यांनी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीदरम्यान शेअर केल्या होत्या. याबाबत आता भारताचे माजी महान अष्टपैलू कपिल देव यांनाही विचारण्यात आले. यावर त्यांनी अगदी सहज सोपं उत्तर दिलं आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कोहलीला नऊ डावात एका शतकासह केवळ १९० धावा करता आल्या आणि ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर तो वारंवार झेलबाद झाला. कर्णधार रोहित शर्माचे आकडेही फार वाईट होते आणि तो तीन सामन्यांच्या पाच डावात केवळ ३१ धावा करू शकला. खराब फॉर्ममुळे रोहित शर्माने सिडनी कसोटी सामना न खेळण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाला या वर्षी जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर पुढील कसोटी खेळायची आहे, पण भारतीय क्रिकेट विश्वात ‘सुपरस्टार’ संस्कृती मागे टाकावी अशी चर्चा सुरू आहे.

हेही वाचा –Kapil Dev on Yograj Singh: “कोण आहे, कोणाबद्दल बोलताय?”, कपिल देव यांचं योगराज सिंह यांच्या बंदुकीने गोळी मारण्याच्या घटनेवर मोठं वक्तव्य; पाहा VIDEO

कपिल देव यांनी सांगितल्याप्रमाणे, हे दोघेही इतके मोठे खेळाडू आहेत की ते त्यांच्या भविष्याबद्दल स्वत: निर्णय घेऊ शकतात. कपिल देव या दोन्ही खेळाडूंच्या भविष्याबद्दल बोलताना म्हणाले, “मी इतरांच्या निर्णयावर कसं भाष्य करू शकतो? मला वाटतं की निवडकर्त्यांनी याबद्दल विचार केला असेल… त्यामुळे, मी काही बोललो तर ते त्यांच्यावर टीका करणाऱ्यासारखं असेल. मला त्यांच्यावर टीका करायची नाही. एक गट म्हणून त्यांनी सर्वच गोष्टींबाबत नियोजन आणि विचार केला असावा,”

हेही वाचा – India Next Captain: ऋषभ पंत नाही २३ वर्षीय युवा खेळाडू भारताचा भावी कर्णधार? कोचने केली निवड; गंभीर-आगरकरमध्ये मतभेद

“विराट आणि रोहित हे खूप मोठे खेळाडू आहेत आणि त्यांना खेळातील त्यांचे भविष्य स्वतःच ठरवू द्या. जेव्हा त्यांच्यामते योग्य वेळ येईल तेव्हा ते स्वत: हा निर्णय घेतील”, असं पुढे कपिल देव म्हणाले.

कपिल देव रोहित आणि कोहली सारख्या खेळाडूंची पूर्वीची कामगिरी आणि त्यांच्या योगदानाची आठवण करून देत चाहत्यांना आणि तज्ञांना संयम राखण्याचे आवाहन केले. “जर निवडकर्त्यांना वाटत असेल की ते अजूनही संघासाठी अपेक्षित अशी कामगिरी करू शकतात , तर आपणही त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांना वेळ दिला पाहिजे,” असं कपिल देव म्हणाले.

Story img Loader