Karun Nair Comeback Story IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. नव्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलबरोबरचं भारताच्या कसोटी इतिहासाचं नवं पर्व सुरू झालं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीवर संघाला नवा कर्णधार मिळाला असून संघात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. शुबमन गिल भारताच्या कसोटी संघाचा नवा कर्णधार असणार आहे. यादरम्यान भारताचा कसोटीमधील त्रिशतकवीर करूण नायरला संधी मिळाली आहे.
“मला काय करावं कळत नाहीये सर. आपण चर्चा करूया आणि काहीतरी करूया…” प्रशिक्षक विजयकुमार मद्यालकर यांना एका संध्याकाळी कर्नाटक अंडर-२५ चा एक खेळाडू त्यांच्या अकादमीत पोहोचतो आणि आपली कारकीर्द पुन्हा रुळावर आणण्याची विनंती करत होता. भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा दुसरा खेळाडू करुण नायर, जूनमध्ये २०२२ च्या हंगामानंतर त्याचा देशांतर्गत संघ कर्नाटकने दुर्लक्ष केले.
२०२२ मध्ये ‘प्रिय क्रिकेट, मला एक संधी दे’ असे म्हणत करुण नायरने भावनिक ट्विट केले होते. यानंतर करुण नायरने कोच मद्यालकर आणि एका व्हॉट्सअॅप ग्रुपच्या मदतीने या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न केला. या ग्रुपने करूण नायरच्या पुनरागमनामध्ये मोठी भूमिका बजावली आहे. शनिवारी (२५ मे) करुण नायरच्या भारतीय संघात पुनरागमनानंतर, प्रशिक्षक साई प्रसन्ना आणि त्यांच्या सहाय्यकांसह ‘कमबॅक सीझन’ ग्रुपचे उद्दिष्ट दोन वर्षांच्या कठोर परिश्रम, मेहनतीनंतर साध्य झाले.
संक्रमणाच्या टप्प्यातून जात असलेल्या टीम इंडियाने नवीन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली करुण नायरला संधी दिली. काही काळापूर्वी, करुण नायरची कारकीर्द धोक्यात आली होती, कारण कर्नाटक संघातून वगळल्यानंतर जुलै २०२२ मध्ये १४ महिन्यांनी नॉर्थम्प्टनशायरसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत पुनरागमनाचा प्रयत्न करत होता.
बेंगळुरूच्या बाहेरील जस्ट क्रिकेट अकादमीमध्ये कर्नाटक अंडर-१९ आणि अंडर-२५ संघांकरता प्रशिक्षक म्हणून काम करणारे मद्यालकर यांच्याबरोबर, करुण नायर दररोज सुमारे तीन तास प्रवास करत असे. मद्यालकर करुण नायरबद्दल म्हणाले, “तो आतून तुटलेला होता. कर्नाटक संघात त्याची निवड का झाली नाही यावर मी चर्चा करू इच्छित नव्हतो. मी त्याला काळजी करू नको असे सांगितले. आपण फक्त त्याच्यातील फलंदाजातील पाहून त्याचं कौशल्य अधिक कसं खुलवता येतील, याकडे लक्ष देऊ. सहा महिने, तो दर दुसऱ्या दिवशी आमच्या अकादमीत येऊन बरोबर ६०० चेंडू खेळायचा, साइड-आर्म थ्रोअर्स आणि इतर गोलंदाजांचा सामना करायचा.”
केएल राहुल आणि करुण नायर सारख्या खेळाडूंना त्यांच्या वयोगटातील क्रिकेट दिवसांपासून खेळताना पाहणारे मद्याललकर म्हणतात की दोन्ही खेळाडूंनी त्यांचे तंत्र आणि फटकेबाजी सुधारण्यावर भर दिला. ते म्हणाले की संपूर्ण देशांतर्गत हंगामात घरच्या मैदानावर एकही सामना न झाल्यामुळे नायर अस्वस्थ होऊ लागला. “तो त्याच्या खेळाची चाचणी घेऊ इच्छित होता, पण आम्ही त्याला खेळण्याची संधी देऊ शकलो नाही. जेव्हा त्याला भारतात संधी मिळाली नाही, तेव्हा त्याने एका वर्षानंतर काउंटी खेळायला सुरुवात केली.”
२०१८ मध्ये ओव्हलमध्ये करुण नायरला मोठा धक्का बसला. त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले. नायरने नॉर्थम्प्टनशायरसाठी त्याच्या दुसऱ्याच काउंटी डिव्हिजन १ सामन्यात कारकिर्दीला संजीवनी देणारी १५० धावांची खेळी केली. या खेळीमुळे २०२३-२४ साठी विदर्भसह पाहुणा खेळाडू म्हणून संधी मिळाली, यामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याने ३३ डावांमध्ये १५५३ धावा केल्या. त्याने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम ठरलेल्या रणजी ट्रॉफी हंगामात ८८३ धावा केल्या आणि विदर्भाला जेतेपदापर्यंत नेले. यानंतर तो आता भारतीय संघात परतला.