‘त्या’ सामन्यात एकच षटकार ठोकला अन् गड्यानं इतिहास रचला, फलंदाजाचं नाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Most Sixes Records In IPL History : किंग्ज इलेव्हन पंजाब टीमच्या त्या फलंदाजाने एकच षटकार ठोकला अन् इतिहास रचला.

Most Sixes Record In IPL
त्या खेळाडूने षटकार ठोकून IPL मध्ये इतिहास रचला. (Image-Indian Express)

Records In IPL History : पंजाब किंग्जचा स्फोटक फलंदाज लियाम लिविंगस्टोनने आयपीएल २०२२ मध्ये धडाकेबाज फलंदाजी करून धुमाकूळ घातला होता. लियामने सनरायजर्स हैद्राबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात एकच षटकार ठोकला अन् विक्रमाला गवसणी घातली. आयपीएलच्या इतिहासात २०२२ पूर्वी असा विक्रम कुणीच करु शकला नाही. लियामने पंजाबकडून खेळताना हैद्राबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात १५ व्या षटकात १००० वा षटकार ठोकून इतिहास रचला.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

९७ मीटरचा षटकार ठोकून लियामने मैदान गाजवलं

लियाम लिविंगस्टोनचा हा षटकार आयपीएल २०२२ सीजनचा १००० वा षटकार होता. लियामने सनरायजर्स विरोधात झालेल्या सामन्यात रोमारियो शेफर्डच्या गोलंदाजीवर ९७ मीटरचा षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता.

नक्की वाचा – IPL : प्ले ऑफ सामन्यात ‘या’ ४ खेळाडूंनी केला होता धमाका; मैदानात ठोकले वादळी शतक

आयपीएलच्या कोणत्याही सीजनमध्ये सर्वात जास्त षटकारांचा विक्रम

आयपीएल २०२२ सीजनमध्ये एकूण १०६२ षटकार ठोकले होते. याआधी कोणत्याही सीजनमध्ये इतके षटकार ठोकले गेले नाहीत. या सीजनमध्ये सर्वात जास्त षटकार ठोकण्याची नोंद करण्यात आली होती. आयपीएल २०१८ मध्ये एकूण ८७२ षटकार ठोकले होते. पण आयपीएल २०२२ मध्ये हा षटकारांचा विक्रम मोडण्यात आला.

IPL च्या एकाच सीजनमध्ये सर्वात जास्त षटकारांचा विक्रम

IPL 2022 – 1062 षटकार

IPL 2018 – 872 षटकार

IPL 2019 – 784 षटकार

IPL 2020 – 731 षटकार

IPL 2012 – 731 षटकार

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 12:57 IST
Next Story
Fixing in Cricket Match: मागील वर्षी १३ सामन्यांमध्ये झाली होती फिक्सिंग? ‘या’ अहवालामुळे क्रिकेट विश्वात उडाली खळबळ
Exit mobile version