India vs England 5th Test: अँडरसन – तेंडुलकर मालिका ही भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलसाठी अतिशय खास ठरली. विराट – रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्यानंतर केएल राहुल हा भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू होता. त्यामुळे त्याच्यावर मोठी जबाबदारी होती. ही जबाबदारी त्याने योग्यरित्या पार पाडली. संघ अडचणीत असताना तो खंबीरपणे उभा राहिला. यादरम्यान त्याच्याकडे सुनील गावसकरांचा एक मोठा विक्रम मोडून काढण्याची संधी होती. पण हा विक्रम अवघ्या ११ धावांनी हुकला.

केएल राहुल हा भारतीय संघातील सर्वात विश्वासू खेळाडू. ज्या क्रमांकावर आवश्यकता असेल त्या क्रमांकावर तो फलंदाजीला उतरतो. इंग्लंड दौऱ्यावर त्याला यशस्वी जैस्वालसोबत डावाची सुरूवात करण्याची संधी मिळाली. या संधीचा फायदा घेत त्याने २ शतकं आणि २ अर्धशतकं झळकावली.

इंग्लंड दौऱ्यावरील ५ कसोटी सामन्यांतील १० डावात फलंदाजी करताना त्याने ५३.२० च्या सरासरीने ५३२ धावा केल्या. मुख्य बाब म्हणजे त्याने १०६६ चेंडू खेळून काढले. त्याच्याकडे सुनील गावसकरांचा मोठा विक्रम मोडून काढण्याची संधी होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या आशियातील सलामीवीर फलंदाजाचा विक्रम हा सुनील गावसकरांच्या नावावर आहे. सुनील गावसकर यांनी १९७९ मध्ये फलंदाजी करताना ५४२ धावा केल्या होत्या. आता २०२५ कसोटी मालिकेत केएल राहुलने ५३२ धावा केल्या आहेत. जर आणखी ११ धावा केल्या असत्या तर त्याने हा मोठा विक्रम मोडून काढला असता. पाकिस्तानचा आमीर सोहेल या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्याने १९९२ मध्ये ४१३ धावा केल्या होत्या. तर मुरली विजयने २०१४ मध्ये ४०२ धावा केल्या होत्या. २०२१ मध्ये फलंदाजी करताना रोहित शर्माने ३६८ धावा केल्या होत्या.

इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे आशियातील सलामीवीर फलंदाज

सुनील गावसकर -५४२ धावा,१९७९
केएल राहुल -५३२ धावा, २०२५
आमीर सोहेल -४१३ धावा, १९९२
मुरली विजय -४०२ धावा, २०१४
रोहित शर्मा -३६८ धावा, २०२१