IPL Interesting Facts : आयपीएलमध्ये जगभरातील अनेक खेळाडूंनी ऐतिहासिक विक्रमांना गवसणी घालून नावलैकीक मिळवलं आहे. विरोधी संघाचा पराभव करण्यासाठी प्रत्येक खेळाडू मैदानात कंबर कसताना दिसतो. अशाच काही धाकड खेळाडूंची आयपीएलच्या इतिहासात नोंद झाली आहे. ‘कॅचेस विन्स द मॅचेस’ असं म्हणतात आणि ते खरंच आहे. कारण मैदानात अनेक खेळाडूंनी अप्रतिम झेल पकडून आपआपल्या संघाला विजय मिळवून दिला. आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त झेल पकडणाऱ्या खेळांडूबाबत आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. यामध्ये तीन भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे. त्यामुळे जाणून घेऊयात आयपीएलमध्ये सर्वात जास्त झेल पकडणाऱ्या खेळाडूंची नावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिस्टर आयपीएलच्या नावाने लोकप्रिय असलेल्या सुरेश रैनाने आयपीएलमध्ये सर्वात जास्त झेल पकडले आहेत. मैदानात अप्रतिम क्षेत्ररक्षण करण्यासाठी रैनाला ओळखलं जात. रैनाने हवेत उडी मारून झेल घेत दिग्गज फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. सुरेश रैनाने आयपीएल इतिहासात सर्वात जास्त १०९ झेल पकडले आहेत. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड भेदक गोलंदाजी आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. आयपीएलमध्ये सर्वात जास्त झेल पकडण्याच्या लिस्टमध्ये पोलार्ड दुसऱ्या स्थानावर आहे. पोलार्डने आयपीएलमध्ये ९६ झेल पकडले आहेत.

नक्की वाचा – MI-W vs UPW-W: नवी मुंबईत MI ची ‘कसोटी’; यूपी वॉरियर्स विरोधात रंगणार एलिमिनेटर सामना, पाहा संभाव्य प्लेईंग XI

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएलच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केला आहे. रोहित शर्माने चौफेर फटकेबाजी करून भल्या भल्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला आहे. पण रोहित अप्रतिम क्षेत्ररक्षण करण्यातही माहिर आहे. आयपीएलमध्ये सर्वात जास्त झेल पकडण्याच्या लिस्टमध्ये रोहित तिसऱ्या स्थानावर आहे. रोहितने ९१ झेल पकडले आहेत. जगातील उत्कृष्ठ फिल्डर म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिविलियर्सने मैदानात छाप टाकली आहे. त्याने आयपीएलमध्ये ९० झेल पकडले आहेत. आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. तसंच त्याने आयपीएलमध्ये ८५ झेलही पकडले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know about players who takes most catches in ipl history suresh raina virat kohli rohit sharma nss
First published on: 24-03-2023 at 15:28 IST