Indian Cricket Team ODI World Cup Semi Finals Record: आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय संघ आठव्यांदा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. मेन इन ब्लूने सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मात्र, १२ वर्षांपासून भारत उपांत्य फेरीतील विजयाची वाट पाहत आहे. कारण गेल्या दोन विश्वचषकात टीम इंडियाला सलग उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. म्हणूनच टीम इंडियाला उपांत्य फेरीत सावध राहावे लागणार आहे. यंदाच्या विश्वचषकात भारताचा उपांत्य फेरीचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीम इंडियाची उपांत्य फेरीतील आकडेवारी चिंताजनक –

आत्तापर्यंत भारताने एकदिवसीय विश्वचषकात एकूण ७ उपांत्य फेरीचे सामने खेळले आहेत, त्यापैकी चार सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. त्याचबरोबर टीम इंडियाने केवळ तीन वेळा विजय मिळवत आला आहे. अशा प्रकारे पराभवाचे आकडे विजयापेक्षा जास्त आहेत, त्यामुळे टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये सावध राहण्याची गरज आहे. विशेषत: यंदा टीम इंडिया अशा संघाचा सामना करणार आहे, ज्याच्या विरुद्ध आयसीसी नॉकआउटमध्ये कधीही विजय मिळवता आला नाही.

उपांत्य फेरीतील टीम इंडियाचा आतापर्यंतचा विक्रम –

१९८३ विश्वचषक – भारताने इंग्लंडचा ६ विकेट्सने पराभव केला (चॅम्पियन)
१९८७ विश्वचषक – इंग्लंडने भारताचा ३५ धावांनी पराभव केला
१९९६ विश्वचषक- पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा पराभव केला
२००३ विश्वचषक- भारताने केनियाचा ९१ धावांनी पराभव केला
२०११ विश्वचषक- भारताने पाकिस्तानचा २९ धावांनी पराभव केला (चॅम्पियन)
२०१५ विश्वचषक- ऑस्ट्रेलियाने भारताचा ९५ धावांनी पराभव केला
२०१९ विश्वचषक- न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव केला

हेही वाचा – Team India: भारतीय खेळाडूंनी घेतला ‘फुटवॉली’चा आनंद, गिलला मारण्यासाठी सिराज खुर्ची घेऊन धावला, पाहा VIDEO

न्यूझीलंडविरुद्ध बाद फेरीत भारत नेहमीच अपयशी –

भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले, तर आयसीसीच्या बाद फेरीत न्यूझीलंडविरुद्ध कधीही विजय मिळवता आलेला नाही. याआधी दोन्ही संघ तीन सामन्यात आमनेसामने आले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी २००० च्या अंतिम फेरीत, २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आणि २०२१ च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने आले होते. प्रत्येक वेळी किवी संघाने भारताचा पराभव केला. या कारणास्तव आता टीम इंडियाला हा विक्रम मोडून न्यूझीलंडकडून आयसीसी बाद फेरीतील मागील तीन पराभवाचा बदला घ्यायचा आहे.

हेही वाचा – AUS vs BAN: ॲडम झम्पाने मोडला आफ्रिदी-हॉगचा विक्रम, विश्वचषकात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा फिरकीपटू

यंदाच्या विश्वचषकात टीम इंडियाने दमदार कामगिरी केली आहे. भारतीय संघ आठ सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत १६ गुणासह अव्वल स्थानी आहे. विजयरथावर स्वार झालेली टीम इंडिया रविवारी नेदरलँडशी भिडणार आहे. साखळी फेरीतील हा शेवटचा सामना असेल. भारतीय संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्याचबरोबर नेदरलँडचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र होण्यासाठी संघर्ष करत आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी शेवटच्या लीग सामन्यापूर्वी बंगळुरूमध्ये फूटवॉलीचा आनंद लुटला. भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know indian cricket team odi world cup semi finals record and knockout match record against new zealand vbm
First published on: 11-11-2023 at 17:56 IST