मुंबई : भुवनेश्वर येथील बिजू पटनायक बंदिस्त स्टेडियमवर सुरू असलेल्या ४०व्या कुमार-कुमारी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत शुक्रवारी महाराष्ट्र व कोल्हापूरच्या दोन्ही संघांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात महाराष्ट्राच्या मुलांनी मणिपूरला १८-५ असे एक डाव आणि १३ गुणांनी नमवले. यात सौरभ अहिर (२.४० मिनिटे व २ गुण), धीरज भावे (२.०० मिनिटे व २ गुण) तर किरण वसावे (२.४० नाबाद व ३ गुण) यांनी अष्टपैलू खेळ केला. मणिपूरकडून ख्रिस्तोफरने १.१० मिनिटे पळती करीत लढत दिली.

मुलींनी तेलंगणाचा २३-३ असा एक डाव राखून धुव्वा उडवला. दीपालीने आपल्या धारदार आक्रमणात सहा गडी टिपले. गौरी शिंदेने नाबाद तीन तर सरिता दिव्या व जानव्ही पेठे यांनी प्रत्येकी २.३० पळती केली.

राष्ट्रीय कुमार-कुमारी खो-खो स्पर्धा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur maharashtra semi finals kho kho ssh
First published on: 25-09-2021 at 01:42 IST