नागपुरात सुरू असलेल्या सुब्रतो मुखर्जी चषक राज्यस्तरीय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र हायस्कूलचे खेळाडू व प्रशिक्षक प्रदीप साळुंखे यांनी सोमवारी अखिलाडू वृत्तीचे प्रदर्शन करून बॉलबॉयचे काम करणाऱ्या एका खेळाडूला मारहाण केली. या प्रकारानंतर संघावर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली.
नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर १७ वर्षांंखालील गटाची पुणे-कोल्हापूर यांच्यात उपांत्य लढत सुरू होती. यादरम्यान बॉलबॉयचे काम करणाऱ्या क्रीडा प्रबोधिनीतील दिनकर वसावे या खेळाडूचा मैदानाबाहेर चेंडू देताना कोल्हापूरच्या अक्षय मुळेसोबत वाद झाला आणि यामध्ये दिनकरला मारहाण करण्यात आली. जखमी दिनकरला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Sep 2014 रोजी प्रकाशित
राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत मारहाण; कोल्हापूरच्या संघावर ३ वर्षांची बंदी
नागपुरात सुरू असलेल्या सुब्रतो मुखर्जी चषक राज्यस्तरीय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र हायस्कूलचे खेळाडू व प्रशिक्षक प्रदीप साळुंखे यांनी सोमवारी
First published on: 02-09-2014 at 01:24 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur team ban for three year in state football