लॉकडाउन काळात घरात बसून कंटाळलेल्या क्रीडा प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. जर्मन सरकारने Bundesliga स्पर्धेला मान्यता दिल्यानंतर, स्पेन सरकारनेही La Liga ही फुटबॉल स्पर्धा पुन्हा सुरु करण्याला संमती दिली आहे. ८ जून पासून ही स्पर्धा पुन्हा एकदा खेळवली जाणार असल्याचं स्पेनचे पंतप्रधान पेड्रो शँचेझ यांनी जाहीर केलं. करोना विषाणूचा प्रादूर्भाव झाल्यानंतर स्पेनमधील सर्व महत्वाच्या फुटबॉल स्पर्धा १२ मार्च रोजी स्थगित करण्यात आल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

La Liga च्या आयोजकांनी याबद्दल अद्याप अधिकृत माहिती दिलेली नसली तरीही अध्यक्ष जेविअर टेबस यांनी स्पर्धा लवकरात लवकर सुरु होईल अशी माहिती दिली होती. मात्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं आहे. “गेल्या काही महिन्यांपासून सर्व क्लब, खेळाडू, प्रशिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याचा हा परिणाम आहे. सरकारच्या या निर्णयाने आम्हाला आनंद झालाय. पण याचसोबत आरोग्यविषयक सर्व नियम पाळणं अत्यंत गरजेचं आहे. तसं न केल्यास ही रोगराई पुन्हा एकदा पसरू शकते आणि आपल्याला ते होऊ द्यायचं नाहीये.” टेबस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रतिक्रीया दिली.

La Liga फुटबॉल स्पर्धेचा चाहतावर्ग मोठा आहे. स्पनेमध्ये आतापर्यंत २ लाखांपेक्षा जास्त लोकांना करोनाची लागण झालेली असून आतापर्यंत २८ हजार नागरिकांनी आपले प्राण गमावलेले आहेत. याव्यतिरीक्त प्रत्येक दिवसाला करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होतेच आहे. शुक्रवारी स्पेनमध्ये ५६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. स्पेनने देशातील काही भागांमधलं लॉकडाउन हळुहळु शिथील करण्यास सुरुवात केली आहे. माद्रिद, बार्सिलोना या शहरात १० लोकांपेक्षा जास्त लोकांना एकत्र रस्त्यावर येण्यास मनाई केलेली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: La liga will be allowed to resume from june 8 says spanish prime minister psd
First published on: 23-05-2020 at 22:00 IST