समालोचन किंवा विविध क्रीडा वाहिन्यांवरील कार्यक्रमांच्यानिमित्त निवृत्त झालेले अनेक दिग्गज क्रिकेटपटू आपल्याला नव्याने दिसतात. मात्र, आता या खेळाडूंना पुन्हा मैदानावर उतरण्याची संधी मिळणार आहे. ‘लिजेंड्स क्रिकेट लीग’ स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राची घोषणा करण्यात आली आहे. यंदा या स्पर्धेत चार संघ सहभागी होणार असून ११० आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळताना दिसणार आहेत. वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांसारखे माजी भारतीय क्रिकेटपटूदेखील लेजेंड्स क्रिकेट लीगच्या (एसएलसी) दुसऱ्या सत्रात खेळताना दिसणार आहेत.

यंदा ही स्पर्धा ओमानमध्ये, २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. भारताचे माजी प्रशिक्षक आणि लिजेंड्स क्रिकेट लीगचे आयुक्त रवी शास्त्री म्हणाले, “दिग्गजांना पुन्हा मैदानावर उतरण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात जगभरातील अव्वल माजी क्रिकेटपटू एकत्र खेळताना दिसणार आहेत. स्पर्धेच्या पहिल्या सत्रात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंनी भारत, आशियाई आणि उर्वरित जग या तीन संघांचे प्रतिनिधित्व केले होते. यावेळी इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर चार फ्रँचायझींचे संघ सहभागी होतील.”

हेही वाचा – India vs West Indies ODI Series : एकदिवसीय मालिकेत शिखर धवन करणार नेतृत्व; रोहित शर्मासह वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एलएलसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमण रहेजा म्हणाले की, आम्ही वेळ आल्यावर सर्व माहिती जाहीर करू. आमच्याकडे सध्या ११० खेळाडू आहेत ज्यांना ऑगस्टच्या सुरुवातीला चार संघांमध्ये विभागले जाईल. या स्पर्धेत भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेचे खेळाडू सहभागी होणार आहेत.

भारताचा माजी फलंदाज असलेला विरेंद्र सेहवाग या स्पर्धेच्या पहिल्या सत्रात सहभागी होऊ शकला नव्हता. मात्र, यावर्षी तो खेळणार आहे. त्याच्यासह इरफान आणि युसुफ पठाण ही भावंडदेखील पुन्हा मैदानात येणार आहेत. गेल्या सत्रात सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज माजी खेळाडू खेळताना दिसले होते.