सातत्याने गोल करण्याच्या अद्भुत क्षमतेच्या जोरावर जगभरातल्या चाहत्यांवर गारूड घालणारा लिओनेल मेस्सी दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. मेस्सीने समाजमाध्यमांवर आपल्या गरोदर पत्नीचे छायाचित्र अपलोड केले. तब्बल चार वेळा वर्षांतील सवरेत्कृष्ट फुटबॉलपटूचा पुरस्कार मिळवणाऱ्या मेस्सीने इन्स्टाग्रामवर अँटोनेला रोकुझो आणि पहिला मुलगा थिआगो यांच्या समवेतचे छायाचित्र टाकले आहे आणि म्हटले आहे.
‘‘तुझ्या येण्याची आतुरतेने वाट बघत आहोत, या जगात तुझे सहर्ष स्वागत असेल, थिओगी आणि आईबाबांकडून खूप साऱ्या शुभेच्छा!’’
संग्रहित लेख, दिनांक 2nd May 2015 रोजी प्रकाशित
मेस्सी पुन्हा बाबा होणार
सातत्याने गोल करण्याच्या अद्भुत क्षमतेच्या जोरावर जगभरातल्या चाहत्यांवर गारूड घालणारा लिओनेल मेस्सी दुसऱ्यांदा बाबा होणार आहे.

First published on: 02-05-2015 at 03:30 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lionel messi and wife expecting second baby