Lionel Messi Retirement from football after qatar football worldcup not going to choose between PSG and Argentina | Loksatta

Lionel Messi Retirement: लियोनेल मेस्सीचा फुटबॉलला अलविदा? म्हणाला कतार विश्वचषक हा माझा शेवटचा…

Lionel Messi Retirement: २०२२ मध्ये कतारमध्ये होणारी विश्वचषक ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची मोठी स्पर्धा असेल, असे मेस्सीने म्हटले आहे

Lionel Messi Retirement: लियोनेल मेस्सीचा फुटबॉलला अलविदा? म्हणाला कतार विश्वचषक हा माझा शेवटचा…
Lionel Messi Retires from football after qatar football worldcup not going to choose between PSG and Argentina

Lionel Messi Retirement: अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी लवकरच फुटबॉलमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यापूर्वीही अनेकदा असे तर्क वितर्क लावण्यात आले होते मात्र यावेळेस स्वतः मेस्सीनेच असे संकेत दिले आहेत. 2022 मध्ये कतारमध्ये होणारी विश्वचषक ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची मोठी स्पर्धा असेल, असे मेस्सीने म्हटले आहे. एका मुलाखतीच्या दरम्यान मेस्सीने याबाबत पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना पुढील ४ वर्षांनंतर होणाऱ्या विश्वचषकाचा आपण भाग नसू असा संकेत देत उत्तर दिले आहे.

पत्रकाराने मुलाखतीच्या दरम्यान मेस्सीला त्याच्या कतार विश्वचषक हा शेवटचा ठरू शकतो का असा थेट प्रश्न केला होता यावर मेस्सीने सरळ हो, हे अगदी शेवटचे आहे असे म्हणत उत्तर दिले. त्यावर तो म्हणाला, होय, हे अगदी शेवटचे आहे. माझ्या कारकिर्दीतील हा शेवटचा विश्वचषक असेल. मी या विश्वचषकाचे आतुरतेने वाट पाहत आहेच पण माझया खेळाबाबत थोडा चिंतीत आहे कारण यंदा अनेक उत्तम खेळणारे संघ मैदानात आहेत. यंदा कतारमध्ये विश्वचषक होणार असून पुढील फूटबॉल विश्वचषक हे २०२६ मध्ये खेळवले जाणार आहे. मेस्सी सध्या ३९ वर्षाचा असल्याने पुढील विश्वचषकाच्या आधीच तो अधिकृत निवृत्तीची घोषणा करणार असल्याची दाट शक्यता आहे.

मेस्सीच्या करिअरची झलक..

मेस्सी हा आंतरराष्ट्रीय फूटबॉलमध्ये सर्वात प्रभावी खेळाडू आहे. आजपर्यंत बार्सिलोना व अर्जेंटिनाकडून खेळताना त्याने चमकदार कामगिरी केली आहे. अर्जेंटिनाकडून त्याने 90 गोल केले आहेत. 2004 ते 2021 अशा १७ वर्षात त्याने संघासाठी ५२० सामने खेळून त्यात ४७४ गोल केले आहेत. मेस्सी सध्या जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आहे. मेस्सीच्या लाखो चाहत्यांनी आतापासूनच सोशल मीडियावर निवृत्तीवरून खेद व्यक्त करायला सुरुवात केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Ind vs Pak Women’s T20 Asia Cup Highlights: पाकिस्तानचा भारतीय संघावर १३ धावांनी विजय

संबंधित बातम्या

विश्लेषण: पोर्तुगाल संघातून ख्रिस्तियानो रोनाल्डोला का वगळले? रोनाल्डोच्या कारकीर्दीची ही अखेर समजावी का?
David Warner Leadership Ban: “त्याला बळीचा बकरा बनवण्यात आले “, माजी खेळाडू मायकेल क्लार्कचे वक्तव्य
IND vs BAN 2nd ODI: ‘जाळ अन् धूर संगटच…’ उमरान मलिकच्या १५१ किमी वेगाने फलंदाजाच्या दांड्या गुल, पाहा video
World Cup Football 2022: उपान्त्यपूर्व फेरीचा थरार आजपासून!; चार माजी विजेते, दोन माजी उपविजेते, दोन नवोदित!
आपल्याला क्रिकेट का आवडतं?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुंबईची ओळख बळकट करणार – एकनाथ शिंदे
महाविकास आघाडीचा १७ डिसेंबरला मोर्चा
शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून बनावट प्रतिज्ञापत्रप्रकरणी अंधेरीत गुन्हा दाखल
पंतप्रधानांच्या घोषणेतील वचन पाळणे बंधनकारक नाही; नोटाबंदीतील सुनावणीत रिझव्‍‌र्ह बँकेच्या वकिलांचा दावा
ठाणे, नवी मुंबई, विरारमध्ये म्हाडाची दोन हजार घरे; येत्या १० दिवसांत जाहिरात, सोडत लवकरच