फुटबॉल विश्वातील एका बातमीने अलीकडेच सर्व फुटबॉलप्रेमींना मोठा धक्का दिला. कारण, स्टार फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सीने बार्सिलोना फुटबॉल क्लबला काही दिवसांपूर्वी निरोप दिला आहे. नंतर, अर्जेंटिनाच्या या फुटबॉलपटूने एक पत्रकार परिषद घेऊन या बातमीवर अधिकृत शिक्कामोर्तब केला. याच पत्रकार परिषदेदरम्यान मेस्सीला अश्रू अनावर झाले. या दरम्यान, त्याने अश्रू पुसण्यासाठी एक टिश्यू वापरला होता. त्यावेळी मेसी वापरलेला हा टिश्यू पेपर आता चक्क विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे.

पत्रकार परिषदेनंतर ‘त्याने’ सगळे टिश्यू गोळा केले

अर्जेंटिनातील माध्यम ‘मिशनेस ऑनलाईन’च्या अहवालानुसार, मेस्सीशी संबंधित वस्तूंची किंमत गगनाला भिडत आहे. मेस्सीने आपले अश्रू पुसण्यासाठी वापरलेला टिश्यू पेपर आता चक्क ‘मर्काडो लिब्रे’ या लोकप्रिय वेबसाइटवर पोहोचला आहे. जिथे चाहत्यांना हा टिश्यू पेपर $ १ दशलक्षात मिळू शकतो. दरम्यान, कॉम्प्लिट स्पोर्ट्स या दुसऱ्या वेबसाइटनुसार, त्या पत्रकार परिषदेनंतर एका अज्ञात व्यक्तीने हा टिश्यू पेपर घेतला आणि एक ऑनलाईन जाहिरात पोस्ट केली की योग्य किंमत आल्यास तो विकला जाईल.”

एका अहवालानुसार असं म्हटलं जात आहे कि, एका व्यक्तीने मेसीच्या पत्रकार परिषदेनंतर मेसीने वापरलेले हे टिश्यू पेपर गोळा केले. त्यानंतर, एक ऑनलाईन जाहिरात पोस्ट केली की योग्य किंमत आल्यास तो विकला जाईल.” मेसेदुयो नावाचा हा माणूस मेसीने वापरलेले हे टिश्यू पेपर विकत आहे. इतकंच नव्हे तर या व्यक्तीचा असा दावा आहे की, मेसीचे जेनेटिक देखील या टिश्यूमध्ये आहेत. जे मेस्सीसारख्या दुसऱ्या फुटबॉलपटूला ‘क्लोन’ करण्यासाठी वापरू जाऊ शकतं.”

मेस्सीने वापरलेल्या टिश्यूच्या प्रतिकृतींची देखील विक्री

मिनुटोउनो डॉट कॉमनुसार, केवळ मूळ टिश्यू पेपर विक्रीसाठी ठेवण्यात आला नव्हता तर त्याची प्रतिकृती देखील ऑनलाइन विकली जात आहे. एक ऑनलाईन वेबसाईट असलेल्या मिलोंगा कस्टमने  मेसीने वापरलेल्या टिश्यूची प्रतिकृती लाँच केली. हे टिश्यू प्लॅस्टिकच्या रॅपमध्ये ठेवण्यात आलं आहेत. तर ह्यात भावनिक झालेल्या मेस्सीचे चित्र देखील आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मर्काडो लिब्रे पेजवर सध्या मात्र हा पेपर अद्याप उपलब्ध नाही. दरम्यान, या जाहिरातीचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ही जाहिरात पाहिल्यानंतर अनेकांनी त्याच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.स्टार फुटबॉलपटू मेस्सी आता ‘पॅरिस सेंट जर्मन’ मध्ये सामील झाला आहे. मेसी २९ ऑगस्ट किंवा १२ सप्टेंबर रोजी PSG साठी पदार्पण करू शकतो. लिओनेल मेस्सीने PSG सोबत दोन वर्षांचा करार केला आहे. जो इतर अनेक फायद्यांसह त्याला प्रत्येक हंगामात ३५ दशलक्ष देखील मिळवून देईल.