Live

Australian Open Final: फॅन्टास्टिक फेडरर..!

रॉजर फेडररचा १८ व्या ग्रँडस्लॅमचा विश्वविक्रम

फेडररच्या खात्यात आता तब्बल १८ ग्रँडस्लॅम जमा झाली आहेत

विलक्षण इच्छाशक्तीचे प्रतीक असरणाऱया रॉजर फेडरर याने पुन्हा एकदा आपणंच टेनिसचे राजे असल्याचे सिद्ध करून दाखवले. वाढत्या वयावरून नेहमी प्रश्नांच्या गोताळ्यात सापडणाऱया फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये स्पेनच्या राफेल नदावर मात करून आपल्या टीकाकारांची तोंडं बंद केली. मेहनतपूर्वक जपलेली तंदुरुस्ती, कसोशीने उंचावत नेलेला खेळाचा दर्जा आणि खेळावरचं निस्सीम प्रेम या आपल्या गुणवैशिष्टयांनी फेडररने उंचावलेला टेनिसचा दर्जा आजही कायम राखला. फेडररने आपल्या सर्वोत्तम कामगिरीचा नजाराण पेश करत ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्याच्या चुरशीच्या लढतीत राफेल नदालवर ६-४, ३-६, ६-१, ३-६, ६-३ असा विजय प्राप्त केला. फेडररने या विजयासह आपल्या कारकीर्दीतील १८ ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकण्याचा विश्वविक्रम केला. विशेष म्हणजे, फेडररचा हा ऑस्ट्रेलियन ओपनमधील १०० वा सामना होता. पाच वर्षांनंतर फेडररच्या खात्यात ग्रँडस्लॅमचे विजेतेपद जमा झाले.

जिंकण्याची अविरत उर्मी, अचंबित करणारे सातत्य ही गुणवैशिष्ट्ये असलेले दोन दिग्गज खेळाडू जेव्हा एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा टेनिस चाहत्यांसाठी एक विलक्षण संधी असते. २०११ नंतर आज पहिल्यांदाच रॉजर फेडरर आणि राफेल नदाल ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांची लढत टेनिस चाहत्यांना ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये पाहायला मिळाली. संपूर्ण जगाचे फेडरर-नदाल लढतीकडे लक्ष लागून होते. सामन्यात फेडररने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत जोशात सुरूवात देखील केली होती. फेडररने पहिला सेट ६-४ ने जिंकून श्रीगणेशा केला होता, तर नदालनेही दुसऱया सेटमध्ये फेडररला जशास तसे प्रत्युत्तर देऊन ३-६ असा विजय प्राप्त केला. मग फेडररने तिसऱया सेटमध्ये घोटीव फटक्यांचा नजराणा पेश करत ६-१ ने वर्चस्व गाजवले. तिसऱया सेटमधील मानहानीकारक पराभवाचा कोणताही मानसिक दबाव निर्माण न होऊ देता नदालने चौथ्या सेटमध्ये चांगली सुरूवात केली आणि सेट ३-६ ने जिंकला देखील. चौथ्या सेटमध्ये दोघांमध्ये अत्युच्च दर्जाची चढाओढ पाहायला मिळाली. पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये सामन्याला रोमांचक वळण मिळाले होते. दोघांमध्ये प्रत्येक गुणासाठी कमालीचे द्वंद्व पाहायला मिळाले. फेडररने पाचव्या सेटमध्ये आपल्या पोतडीतील नजाकती फटक्यांचा नजारा पेश करत तब्बल साडेतीन चाललेल्या या लढाईत विजय साजरा केला.

फेडररच्या खात्यात आता तब्बल १८ ग्रँडस्लॅम जमा झाली आहेत. तर राफेल नदालकडे एकूण १४ ग्रँड स्लॅम जेतेपदं आहेत.  याआधी या दोघांमध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धेत असंख्य मॅरेथॉन लढती झाल्या आहेत. तशाच अनुभवाची प्रचिती जगभरातील चाहत्यांना मिळाली. खरंतर हार्ड कोर्टवरच्या लढतीतही नदालकडे ९-७ अशी आघाडी होती. ती आज ९-८ अशी कमी झाली आहे.

Roger Federer vs Rafael Nadal 

Live Updates
12:37 (IST) 29 Jan 2017
फेडरर ठरला ऑस्ट्रेलियन ओपनचा विजेता
12:15 (IST) 29 Jan 2017
फेडररची अफलातून सर्व्हिस, जेतेपदासाठी केवळ एका गुणाची गरज
12:08 (IST) 29 Jan 2017
फेडररची निर्णयाक सेटमध्ये ५-३ अशी आगेकूच
12:06 (IST) 29 Jan 2017
फेडररची अफलातून खेळी, तब्बल २६ शॉट्सनंतर फेडररच्या खात्यात गुण
12:05 (IST) 29 Jan 2017
नदालचे जशास तसे प्रत्युत्तर
12:02 (IST) 29 Jan 2017
फेडररची हुशारीने खेळी, नदाल भांबावला
11:58 (IST) 29 Jan 2017
फेडररने घेतली ४-३ ने आघाडी
11:58 (IST) 29 Jan 2017
फेडररची दमदार सर्व्हिस आणि त्यानंतर फोरहँडचे अफलातून फटके
11:57 (IST) 29 Jan 2017
पाचव्या सेटमध्ये फेडरर, नदाल यांच्यात ३-३ अशी बरोबरी
11:48 (IST) 29 Jan 2017
फेडररचेही कमबॅक, एका गुणाची कमाई
11:45 (IST) 29 Jan 2017
नदालची झुंजार खेळी, ३-१ ने आघाडीवर
11:37 (IST) 29 Jan 2017
पाचव्या सेटमध्ये नदाल २-१ ने आघाडीवर
11:36 (IST) 29 Jan 2017
फेडररचे कमबॅक, पाचव्या सेटमध्ये पहिल्या गुणाची कमाई
11:34 (IST) 29 Jan 2017
नदालची २-० ने आघाडी
11:27 (IST) 29 Jan 2017
पाचव्या सेटमध्ये पहिला गुण नदालच्या खात्यात
11:23 (IST) 29 Jan 2017
पाचव्या सेटमध्ये नदालची दमदार सुरूवात
11:18 (IST) 29 Jan 2017
फेडररने मेडिकल टाईम आऊट घेतला
11:15 (IST) 29 Jan 2017
चौथा सेट नदालच्या खिशात, नदालने ६-३ ने सेट जिंकला
11:13 (IST) 29 Jan 2017
फेडररच्या खात्यात एक गुण, नदाल ५-३ ने आघाडीवर
11:09 (IST) 29 Jan 2017
चौथ्या सेटमध्ये चुरशीची लढत, नदाल ५-२ ने आघाडीवर
11:02 (IST) 29 Jan 2017
नदालची अफलातून कामगिरी, तिसऱया सेटमध्ये ४-१ ने आघाडी
10:55 (IST) 29 Jan 2017
नदालच्या खात्यात आणखी एक गुण, ३-१ ने आघाडी
10:48 (IST) 29 Jan 2017
नदालने गुणाची कमाई करत घेतली २-१ ने आघाडी
10:46 (IST) 29 Jan 2017
फेडररचेही प्रत्युत्तर, १-१ ने बरोबरी
10:44 (IST) 29 Jan 2017
चौथ्या सेटमध्ये नदालचा श्रीगणेशा, १-० ने आघाडी
10:37 (IST) 29 Jan 2017
फेडरर ऑन टॉप..तिसरा सेट ६-१ ने जिंकला
10:29 (IST) 29 Jan 2017
फेडररची अफलातून खेळी, ५-१ ने आघाडी
10:23 (IST) 29 Jan 2017
फेडररची आणखी एका गुणाची कमाई, तिसऱया सेटमध्ये ४-१ ने आघाडी
10:21 (IST) 29 Jan 2017
अखेर नदालने खाते उघडले, तिसऱया सेटमध्ये पहिल्या गुणाची कमाई
10:10 (IST) 29 Jan 2017
फेडररची अफलातून खेळी, ३-० ने आघाडीवर
10:09 (IST) 29 Jan 2017
फेडररच्या खात्यात आणखी एक गुण, २-० ने आघाडीवर
10:03 (IST) 29 Jan 2017
अखेर तिसऱया सेटमधला पहिला गुण फेडररच्या खात्यात
10:02 (IST) 29 Jan 2017
फेडररच्या अफलातून सर्व्हिस
10:02 (IST) 29 Jan 2017
तिसऱया सेटमध्ये पहिल्या गुणासाठी फेडरर, नदालमध्ये चढाओढ
9:57 (IST) 29 Jan 2017
तिसऱया सेटकडे सर्वांचे लक्ष
9:55 (IST) 29 Jan 2017
नदालचे कमबॅक, दुसरा सेट ६-३ ने जिंकला
9:54 (IST) 29 Jan 2017
फेडररचे कमबॅक, एका गुणाची भर
9:49 (IST) 29 Jan 2017
नदालची दमदार खेळी, दुसऱया सेटमध्ये नदाल ५-२ ने आघाडीवर
9:46 (IST) 29 Jan 2017
फेडररच्या खात्यात आणखी एक गुण, अजूनही नदाल ४-२ ने आघाडीवर
9:45 (IST) 29 Jan 2017
फेडररची अफलातून खेळी, ४०-० ने आघाडीवर
9:41 (IST) 29 Jan 2017
अखेर दुसऱया सेटमध्ये फेडररने खाते उघडले, नदाल ४-१ ने आघाडीवर
9:36 (IST) 29 Jan 2017
नदालच्या खात्यात आणखी एक गुण, फेडररवर ४-० ने आघाडी
9:32 (IST) 29 Jan 2017
नदालची दुसऱया सेटमध्ये दमदार कामगिरी, ३-० ने आघाडी
9:23 (IST) 29 Jan 2017
नदालच्या खात्यात आणखी एक गुण, दुसऱया सेटमध्ये नदालची २-० ने आघाडी
9:18 (IST) 29 Jan 2017
दुसऱया सेटमध्ये नदालची चांगली सुरूवात, १-० ने आघाडी
9:12 (IST) 29 Jan 2017
धमाकेदार, फेडररने पहिला सेट ६-४ ने जिंकला
9:06 (IST) 29 Jan 2017
फेडररने आघाडी कायम राखली, ५-३ ने आघाडीवर
9:02 (IST) 29 Jan 2017
फेडररकडे पहिल्या सेटमध्ये ४-३ ने आघाडी
9:01 (IST) 29 Jan 2017
फेडररची अफलातून खेळी, नदालवर दमदार स्मॅश
9:00 (IST) 29 Jan 2017
नदालचा आऊट साईड फटका, फेडररकडे ३०-१५ ने आघाडी

Web Title: Live update roger federer vs rafael nadal the 2017 australian open mens final video streaming updates highlights