लिव्हरपूलने विजयी घोडदौड कायम राखत क्रिस्टल पॅलेस संघाचा ३-१ असा पराभव करून इंग्लिश प्रीमिअर लीगच्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. लिव्हरपूलकडून लुईस सुआरेझ (१३व्या मिनिटाला), डॅनियल स्टरिज (१७व्या मिनिटाला) आणि स्टीव्हन गेरार्ड (३८व्या मिनिटाला) यांनी गोल केले. क्रिस्टलकडून ड्वाईट गेलने (७६व्या मिनिटाला) एकमेव गोल केला. मँचेस्टर सिटीने एव्हरटनची विजयी परंपरा ३-१ अशी खंडित केली. मँचेस्टरकडून अल्वारो नेग्रेडो (१७व्या मिनिटाला), सर्जीओ अॅग्युरो (४५व्या मिनिटाला) यांनी गोल केले. टिम होवार्डने स्वत:च गोल करत सिटीचा तिसरा गोल झळकावला. एव्हरटनकडून रोमेलू लुकालू (१६व्या मिनिटाला) याने गोल केला. न्यूकॅसलने कार्डिफचे आव्हान २-१ असे पार केले.
संग्रहित लेख, दिनांक 6th Oct 2013 रोजी प्रकाशित
लिव्हरपूल अव्वल
लिव्हरपूलने विजयी घोडदौड कायम राखत क्रिस्टल पॅलेस संघाचा ३-१ असा पराभव करून इंग्लिश प्रीमिअर लीगच्या गुणतालिकेत
First published on: 06-10-2013 at 06:04 IST
TOPICSइंग्लिश प्रीमियर लीग
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Liverpool stands top in english premier league