इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) यशानंतर आता सर्वच खेळांमध्ये लीग स्पर्धा घेण्याचे पेव फुटले आहे. क्रिकेट, कबड्डी, बॅडमिंटन, हॉकी, बॉक्सिंग या खेळानंतर आता बुद्धिबळ लीग स्पर्धेची मेजवानी चाहत्यांना मिळणार आहे. आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र बुद्धिबळ लीग स्पर्धा डिसेंबर महिन्यात पुण्यात होणार आहे. बुद्धिबळपटूंवर बोली लागणारी ही जगातील पहिलीच स्पर्धा ठरणार आहे.
भारतातील तीन दिग्गज बुद्धिबळपटू सोडले तर देशातील बरेचसे अव्वल खेळाडू या स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक आहेत. परिमार्जन नेगी, सूर्यशेखर गांगुली, अभिजित गुप्ता यांच्यासारख्या ग्रँडमास्टर्सनी आपला सहभाग जवळपास निश्चित केला असून जगज्जेता विश्वनाथन आनंद, पी. हरिकृष्ण आणि कृष्णन शशीकिरणसारखे दिग्गज खेळाडू या स्पर्धेत खेळणार नाहीत, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
बुद्धिबळ खेळाचा प्रसार करणे आणि युवा खेळाडूंना ग्रँडमास्टर्स तसेच महिला ग्रँडमास्टर्ससह खेळण्याची संधी मिळावी, या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे सांघिक अजिंक्यपद पद्धतीने ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.
फ्रँचायझी संघ
मुंबई, पुणे, नागपूर, सांगली/कोल्हापूर,
औरंगाबाद, जळगाव
संघातील खेळाडू
ग्रँडमास्टर, महिला ग्रँडमास्टर, आंतरराष्ट्रीय मास्टर, महिला खेळाडू, मानांकित खेळाडू आणि १६ वर्षांखालील मानांकित खेळाडू (प्रत्येकी एक)
स्पर्धेचे स्वरूप
* प्रत्येक संघाचे पाच सामने
* राऊंड-रॉबिन पद्धतीने होणार स्पर्धा
*चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र
*उपांत्य, अंतिम फेरीचे प्रत्येकी दोन सामने
*लढत बरोबरीत सुटल्यास संघातील एका खेळाडूला द्यावी लागणार झुंज
लीगचे ‘अर्थ’कारण!
*प्रत्येक फ्रँचायझीला खेळाडूंवर बोली लावण्यासाठी तीन लाख रुपये खर्च करण्याची परवानगी
*संघातील एका ग्रँडमास्टर्सवर किमान ६० हजार रुपयांची बोली लागणार
*महिला ग्रँडमास्टर आणि आंतरराष्ट्रीय मास्टरवर ३० हजारांची; अन्य खेळाडूंवर किमान १० हजार रुपयांची बोली लागणार
*विजेत्या संघातील खेळाडूंना पाच लाख रुपयांचे इनाम

Indian Premier League Cricket Mumbai vs Chennai ipl 2024 match sport news
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: मुंबई-चेन्नई आमनेसामने! पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत आज वानखेडेवर होणाऱ्या द्वंद्वात धोनीवर लक्ष
Rohit Sharma statement regarding the World Cup 2027 sport news
पुढील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास उत्सुक! इतक्यातच निवृत्तीचा विचार नाही; रोहितचे वक्तव्य
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार
Rashid Khan is 4 wickets away from creating history
IPL 2024 : मुंबईविरुद्ध राशिदला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! गुजरातसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरणार पहिला गोलंदाज