विराट कोहली आणि शिखर धवन यांच्यातील तथाकथित भांडणानंतर भारतीय ड्रेसिंगरूममधील वातावरण काहीसे दडपणाखाली आहे. भारतीय ड्रेसिंगरूममधून कल्पनाशक्तीला वाव देणाऱ्या ज्या बातम्या बाहेर येत आहेत, त्यावर वॉर्नर ब्रदर्स एक उत्तम चित्रपटू बनवू शकतील, असे सांगत धोनीने पत्रकार परिषदेत रंगत आणली.
‘‘विराट कोहलीने चाकू वापरून शिखर धवनच्या पोटात खुपसला. जेव्हा तो शुद्धीवर आला, तेव्हा त्याने कोहलीला बॅटिंगसाठी मैदानावर पाठवले,’’ असे धोनीने उपहासाने सांगितले. गेल्या आठवडय़ात कोहली आणि धवन यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर भारतीय ड्रेसिंगरूममधून अनेक काल्पनिक बातम्या बाहेर येत आहेत.
‘‘या सर्व कपोलकल्पित बातम्या आहेत. अशा बातम्यांमुळे एखाद्या वर्तमानपत्राचा खप वाढू शकेल. मार्वेल आणि वॉर्नर बंधूंनी या बातम्यांवर आधारित चित्रपट काढायचा ठरवल्यास, एक सर्वोत्तम चित्रपट तयार होऊ शकेल. या बातम्या कुठून येत आहेत, हे मला माहीत नाही. जर भारतीय संघातील एखादा खेळाडू या बातम्या बाहेर पसरवत असेल, तर त्याचे नाव मला सांगा. कारण त्याच्या कल्पनाशक्तीला वाव मिळण्यासाठी भारतीय ड्रेसिंगरूम हे योग्य व्यासपीठ नाही. त्याने चित्रपट बनविणाऱ्या कंपनीत काम करायला हवं. जे ड्रेसिंगरूममध्ये घडले नाही, ते त्याने प्रसिद्धीमाध्यमांसमोर सादर केले आहे,’’ असेही धोनीने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Dec 2014 रोजी प्रकाशित
भारतीय ड्रेसिंगरूमवर आधारित चित्रपट निघू शकेल -धोनी
विराट कोहली आणि शिखर धवन यांच्यातील तथाकथित भांडणानंतर भारतीय ड्रेसिंगरूममधील वातावरण काहीसे दडपणाखाली आहे.

First published on: 26-12-2014 at 06:18 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make a movie about indian dressing room ms dhoni