मँचेस्टर सिटीवर विजय; गुणतालिकेत दुसरे स्थान

थिओ वॉलकॉट व ऑलिव्हर गिरॉड यांच्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर आर्सेनल क्लबने इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पध्रेत मँचेस्टर सिटीवर २-१ असा विजय साजरा केला. या विजयाबरोबर आर्सेनलने जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या लेईस्टर क्लबला धोक्याचा इशारा दिला आहे.

गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या लेईस्टरपाठोपाठ (३८) दोन गुणांच्या पिछाडीसह आर्सेनल (३६) दुसऱ्या स्थानावर आहे.

मेसूट ओझीलच्या पासवर ३३व्या मिनिटाला वॉलकॉटने आर्सेनलचे गोल खाते उघडले. गोलजाळीच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या वॉलकॉटने अगदी सहजतेने चेंडू गोलजाळीत धाडला.

४५व्या मिनिटाला ऑलिव्हरने त्यात भर टाकली आणि आर्सेनलला मध्यंतराला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ऑलिव्हरचा १४ सामन्यांमधील हा १२वा गोल होता. सिटीकडून याया टोरेला ८२व्या मिनिटाला गोल नोंदवण्यात यश आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.