IPL च्या तेराव्या हंगामासाठी आता सर्व संघ सज्ज झाले आहेत. २० ऑगस्टनंतर एक-एक करत सर्व संघ युएईत दाखल झाले आहेत. भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने यंदाच्या स्पर्धेचं आयोजन १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईत केलं आहे. भारतीय संघाचा कर्णधार आणि आयपीएलमध्ये RCB संघाचं नेतृत्व करणारा विराट कोहलीही दुबईत दाखल झाला आहे. दुबईत आल्यानंतर विराटने आपल्या हॉटेलच्या रुमवर एक फोटो काढत चाहत्यांना आपण दुबईत पोहचल्याचं सांगितलं.

 

View this post on Instagram

 

Hello Dubai

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

साहजिकचं विराटच्या या फोटोवर त्याच्या चाहत्यांनी त्याला यंदा ट्रॉफी जिंकूनच ये…आणि शुभेच्छांचे संदेश दिले. परंतू विराटच्या या पोस्टवर मराठी सिने-सृष्टीतली आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरने, दाजी काळजी घ्या, सेफ रहा ! अशी कमेंट केली आहे. सईच्या या अतरंगी कमेंटला नेटकऱ्यांनीही पसंती दर्शवली आहे.

विराटच्या RCB संघाची आयपीएलमधली कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. आतापर्यंत एकही विजेतेपद RCB ला पटकावता आलेलं नाही. परंतू यंदा विराटच्या संघाकडे विजयासाठी चांगली संधी असणार आहे. त्यामुळे यंदा विराट आणि RCB ची कामगिरी कशी होते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.