मारिओ बालोटेली याने लांब अंतरावरून केलेल्या अप्रतिम गोलामुळेच मिलान संघाने येथील फुटबॉल लीगमध्ये सिरी ए जाएंट्स संघावर १-० असा रोमहर्षक विजय मिळविला. त्याने केलेल्या या गोलमुळे त्याच्यावर टीका करणाऱ्यांना त्याने चोख उत्तर दिले आहे.
मिलान संघास नापोलीविरुद्ध १-३ असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्या वेळी बालोटेली याची कामगिरी अपेक्षेइतकी झाली नव्हती. तसेच त्याला नुकतेच अपत्य झाले आहे व तो आता संसारी झाला आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव संपत आला आहे अशी टीका झाली होती.