Australia vs Pakistan ICC Cricket World Cup 2023 Match Updates: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील १८व्या सामन्यात पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले आहेत. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने शानदार सुरुवात केली. डेव्हिड वार्नर आणि मिचेल मार्शने या दोघांनी शतकं झळकावून ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करुन दिली. त्याचबरोबर डेव्हिड वार्नर रोहित शर्माच्या एका स्पेशल क्लबमध्ये सामील झाला आहे. त्याचबरोबर या जोडीने २५९ धावांची भागीदारी करत विश्वचषकातील सर्वात मोठी सहावी भागीदारी नोंदवली.

एकदिवसीय विश्वचषकाच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये मिचेल मार्श अपयशी ठरला होता, पण पाकिस्तानविरुद्धच्या चौथ्या सामन्यात या फलंदाजाने आपली लय परत मिळवून शतक पूर्ण केले आणि त्याचा सहकारी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरसोबत पहिल्या विकेटसाठी २५९ हून धावांची भागीदारी केली. त्यानंतर मिचेल मार्श १२१ धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियासाठी विश्वचषक इतिहासातील ही सर्वात मोठी सलामीची भागीदारी ठरली. याआधी शेन वॉटसन आणि ब्रॅड हॅडिन यांनी २०११ मध्ये १८३ धावांची भागीदारी केली होती.

Marcus Stoinis Highest individual scores in IPL run chases with 124 Runs
IPL 2024: मार्कस स्टॉइनसची ऐतिहासिक खेळी, आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला फलंदाज
Boucher Pollard Argued With Umpire
MI vs CSK : चेन्नईविरुद्धच्या ‘लाइव्ह मॅच’मध्ये मुंबईच्या बाउचर, पोलार्ड आणि डेव्हिडने पंचांशी घातला वाद, पाहा VIDEO
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक

मिचेल मार्शने पाकिस्तानविरुद्ध झळकावले पहिले एकदिवसीय शतक –

मिचेल मार्शने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील पहिले शतक ठरले. तसेच पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध एकदिवसीय फॉर्मेटमधील पहिले शतक झळकावले. त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील मार्शचे दुसरे शतक होते. या सामन्यात मार्शने १०० चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले आणि यादरम्यान त्याने ६ षटकार आणि १० चौकार लगावले. मार्शने नवाजच्या चेंडूवर चौकार मारून शतक पूर्ण केले. या सामन्यात मार्शने १०८ चेंडूत ९ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने १२१ धावा केल्या.

मिचेल मार्शने त्याच्या वाढदिवशी पाकिस्तानविरुद्ध झळकावले शतक –

मिचेल मार्शने त्याच्या ३२व्या वाढदिवसानिमित्त २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले. त्याच्या वाढदिवशी एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणारा तो ऑस्ट्रेलियाचा पहिला खेळाडू ठरला. एकदिवसीय विश्वचषकात त्याच्या वाढदिवसानिमित्त, तो रॉस टेलरनंतर पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणारा दुसरा खेळाडू ठरला.

त्यांच्या वाढदिवशी एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारे खेळाडू –

१४०* धावा – टॉम लॅथम विरुद्ध नेदरलँड्स, हॅमिल्टन, २०२२ (३० वा )
१३४ धावा – सचिन तेंडुलकर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजाह, १९९८ (२५ वा)
१३१* धावा – रॉस टेलर विरुद्ध पाकिस्तान, पल्लेकेले, २०११ (२७वा)
१३० धावा – सनथ जयसूर्या विरुद्ध बांगलादेश, कराची, २००८ (३९वा)
१००* धावा – विनोद कांबळी विरुद्ध इंग्लंड, जयपूर १९९३ (२१ वा)
१२१ धावा – मिचेल मार्श विरुद्ध पाकिस्तान, बेंगळुरू, २०२३ (३२ वा)

एकदिवसीय विश्वचषकात सलामीच्या फलंदाजांची शतके –

उपुल थरंगा आणि तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका) विरुद्ध झिम्बाब्वे, पल्लेकेले, २०११
उपुल थरंगा आणि तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका) विरुद्ध इंग्लंड, कोलंबो (आरपीएस), २०११, उपांत्यपूर्व फेरी
रोहित शर्मा आणि केएल राहुल (भारत) विरुद्ध श्रीलंका, लीड्स, २०१९
डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध पाकिस्तान, बंगळुरू, २०२३