Mitchell Starc said I have been in the team for a long time: अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडचा पराभव करत १-० अशी आघाडी घेतली. मालिकेतील दुसरी कसोटी बुधवारपासून लॉर्ड्सवर खेळवली जाणार आहे. आघाडी दुप्पट करण्याकडे ऑस्ट्रेलियन संघाचे लक्ष असेल. ऑस्ट्रेलियन संघाने शेवटच्या कसोटीत मिचेल स्टार्कला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले. मात्र लॉर्ड्स कसोटीत त्याचे पुनरागमन अपेक्षित आहे. मात्र, या सामन्यापूर्वी स्टार्कने मोठे वक्तव्य केले आहे.

संघातून वगळल्याबद्दल स्टार्कचे वक्तव्य –

स्टार्कने एजबॅस्टन येथील सलामीच्या कसोटीसाठी निवड न झाल्याबद्दल पत्रकारांना सांगितले की, “इंग्लंडमध्ये आल्यानंतर मला याची सवय झाली आहे. ही संघाची मानसिकता आहे, मागील वेळेप्रमाणेच. मी संघात बराच काळ आहे, मला बर्‍याच वेळा वगळण्यात आले आहे. कदाचित या संघात सर्वात जास्त वगळले गेले आहे, त्यामुळे माझ्यासाठी हे काही नवीन नाही. कदाचित ही शेवटची वेळही नसेल.”

Sunil Narine Denied to Play T20 WC 2024 From west Indies
आयपीएलमध्ये शतक आणि हॅट्ट्रिक नावावर असणाऱ्या खेळाडूचा ट्वेन्टी२० वर्ल्डकप खेळण्यास नकार
Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Manoj Tiwary criticizes Glenn Maxwell
IPL 2024 : मॅक्सवेलच्या फ्लॉप शोवर माजी भारतीय खेळाडूची सडकून टीका; म्हणाला, ‘तो वेळोवेळी फक्त पगार घेतोय पण…’
Ricky Ponting Argued With Umpire
IPL 2024 : राजस्थानविरुद्धच्या सामन्यात रिकी पाँटिंगने पंचाशी घातला वाद, काय होतं कारण? जाणून घ्या

निवडीबद्दल कोणतीही बातमी मिळाली नाही –

गुरुवारपासून सुरू होणाऱ्या लॉर्ड्स कसोटीसाठी संघात पुनरागमन करण्याबाबत विचारले असता मिचेल स्टार्क म्हणाला, “संघाच्या दृष्टीने, मला कोणत्याही प्रकारे (लॉर्ड्ससाठी निवडीबद्दल) कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. निवडकर्त्यांनी निर्णय घेईपर्यंत तुमचा अंदाज माझ्यासारखाच चांगला आहे. माझ्याकडे या गोलंदाजी गटात बसणारी भिन्न कौशल्ये आहेत, त्यामुळे मला माझी पाळी आली तर मी जाण्यास तयार आहे. या आठवड्यात नाही तर मी हेडिंगलीसाठी तयार आहे.”

हेही वाचा – ODI World Cup 2023: वन डे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर होताच जय शाह यांचे आवाहन; म्हणाले, “अविस्मरणीय स्पर्धेसाठी…”

मार्नस लाबुशेनला दुखापत –

ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा प्रमुख फलंदाज मार्नस लाबुशेनला लॉर्ड्सवर नेट सत्रादरम्यान हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या अॅशेस कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये चिंता वाढली आहे. शनिवारी जेव्हा तो आणि स्टीव्ह स्मिथ दोघेही नेट सेशनमध्ये भाग सहभागी झाले होते, तेव्हा लीबुशेनच्या बोटाला दुखापत झाली. लाबुशेन आणि स्मिथ यांच्या व्यतिरिक्त, संघाचे राखीव खेळाडू उपस्थित होते, त्यावेळी कोचिंग स्टाफने त्यांच्याकडून थ्रोडाउनचा सराव करुन घेतला.

दुखापतीनंतर त्याला तीव्र वेदना होत होत्या आणि तो अचानक जमिनीवर बसला. यानंतर डॉक्टरांनी त्याचे बोट तपासले. त्यानंतर त्यांनी मैदान सोडले. तो नंतर खेळायला आला असला तरी तो लयीत दिसला नाही. पुढच्या सामन्यात तो खेळेल की नाही याबाबत अजूनही साशंकता आहे.