scorecardresearch

Team India: ‘…म्हणून भारतीय संघ १० वर्षे झाली तरी आयसीसी ट्रॉफी जिंकू शकला नाही’, पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे वक्तव्य

Mohammad Hafeez Statement: टीम इंडियाने २०१३ पासून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. यावर आता पाकिस्तानच्या माजी खेळाडूने मोठा खुलासा केला आहे.

Mohammad Hafeez on Team India
टीम इंडिया (फोटो-संग्रिहत छायाचित्र लोकसत्ता)

Mohammad Hafeez on Team India: भारतीय संघाने शेवटची कोणतीही आयसीसी ट्रॉफी जिंकून १० वर्षे झाली आहेत. टीम इंडियाने २०१३ पासून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. संघातील खेळाडू बदलले, प्रशिक्षक बदलले, कर्णधारही बदलला पण तरीही आयसीसी ट्रॉफी हाताला लागली नाही. या १० वर्षांत टीम इंडियाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. याबाबत पाकिस्तानचा माजी खेळाडू मोहम्मद हाफिजने एक मोठं वक्तव्य केलं आहे.

टीम इंडिया मोठ्या टूर्नामेंटमध्ये स्वतःवर दबाव घेण्यास सुरुवात करते –

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिजने आयसीसी ट्रॉफीमध्ये भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण सांगितले आहे. हाफिजने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, टीम इंडिया मोठ्या टूर्नामेंटमध्ये स्वतःवर दबाव घेण्यास सुरुवात करते, ज्यामुळे टीमची कामगिरी खराब होते. मोठ्या टूर्नामेंटच्या बाद फेरीत दडपण असते, असे हाफिजने सांगितले. यामुळेच टीम इंडिया हे दडपण सहन करू शकत नाही आणि स्पर्धेतून बाहेर पडते.

हेही वाचा – IPL 2023: पंजाब संघाला मोठा धक्का; ‘हा’ स्फोटक इंग्लिश फलंदाज आयपीएलमधून बाहेर होण्याची शक्यता

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फरक –

हाफिज पुढे म्हणाला की ज्याप्रमाणे देशांतर्गत क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फरक आहे, त्याचप्रमाणे द्विपक्षीय मालिका आणि आयसीसी स्पर्धांमध्येही फरक आहे. तुम्ही या दोघांची एकमेकांशी तुलना करू शकत नाही. २०२२ च्या विश्वचषकाबाबत हाफिज म्हणाला की, या स्पर्धेत संघाची कामगिरी अत्यंत खराब होती. टीम इंडिया येथेही दबाव सहन करण्यात अयशस्वी ठरली, ज्यामुळे ती क्वालिफाय न होता स्पर्धेतून बाहेर पडली.

२०१३ नंतर आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियाची स्थिती –

१.टीम इंडिया २०१४ साली वर्ल्ड टी-२० च्या फायनलमध्ये पोहोचली होती, मात्र त्यांना श्रीलंकेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
२.यानंतर २०१५ मध्ये एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव झाला.
३.यानंतर २०१६ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते.
४.२०१७ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
५.टीम इंडियाचा २०१९ वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्येही पराभव झाला होता.
६.२०२१ च्या टी-२० विश्वचषकाची पाळी होती, ज्यामध्ये टीम इंडिया आधीच पहिल्या फेरीतून बाहेर पडली.
७.टीम इंडियाचा २०२२ टी-२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभव झाला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 22:22 IST

संबंधित बातम्या