Mohammed Shami Update: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना २९५ धावांनी टीम इंडियाने जिंकला होता. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया कठीण स्थितीत असल्याचे दिसत आहे. गुलाबी चेंडूच्या सामन्यात टीम इंडिया सुरूवातीपासूनच बॅकफूटवर आहे. दरम्यान, भारतीय संघ आणि चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे.

भारताचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या काही काळापासून भारतीय संघाबाहेर आहे. पण आता तो लवकरच ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार होऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे. या मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी शमी टीम इंडियामध्ये सामील झाला तर टीम इंडियाच्या गोलंदाजीला आणखी बळ मिळेल.

हेही वाचा – Mohammed Siraj Fastest Ball: 181.6 kmph… मोहम्मद सिराजने टाकला क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू? स्क्रिनवर दाखवण्यात आलेल्या वेगाचं काय आहे सत्य

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, BCCI राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) कडून शमी फिट असल्याचे प्रमाणपत्र देण्याची वाट पाहत आहे. एकदा मोहम्मद शमीला एनसीएकडून होकार मिळाला की यानंतर मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतो.

BCCI ची वरिष्ठ निवड समिती शमीचा कसोटी संघात समावेश करण्यासाठी NCA च्या नवीन फिटनेस चाचणीच्या निकालाची वाट पाहत आहे. बीसीसीआयने सर्व तयारी केल्याचेही म्हटले जात आहे. मोहम्मद शमीचा व्हिसाही तयार आहे, फक्त एनसीएकडून होकार आला की शमी लगेचेच ऑस्ट्रेलियासाठी रवाना होईल.

हेही वाचा – VIDEO: सिराज आणि हेड लाईव्ह सामन्यातच भिडले, क्लीन बोल्ड झाल्याने हेड संतापला अन् सिराजनेही दाखवले डोळे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना २९५ धावांनी जिंकला होता, मात्र ॲडलेडमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला शमीसारख्या अनुभवी गोलंदाजाची उणीव जाणवत होती. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे की निवड समिती फक्त एनसीएच्या फिटनेस क्लिअरन्स रिपोर्टची वाट पाहत आहे. शमी नुकताच आपला फिटनेस सिद्ध करण्यासाठी बेंगळुरूला गेला होता. त्याने रणजी करंडक आणि सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही भाग घेतला होता. जिथे त्याची कामगिरी अप्रतिम होती. शमीचे किटही तयार असल्याचे त्यांनी सांगितले. आता फक्त एनसीएच्या फिटनेस रिपोर्टची प्रतिक्षा आहे.