Case by Mohmmed Shami’s Wife: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. हसीन जहाँ आणि मोहम्मद शमी सध्या वेगळे राहत आहेत. कोलकाता न्यायालयाने भारतीय वेगवान गोलंदाजाला त्याची पत्नी हसीन जहाँला भरपाई देण्याचे आदेश दिले. अलीपूर न्यायालयाच्या न्यायाधीश अनिंदिता गांगुली यांनी या प्रकरणाचा निकाल दिला.

शमीचे वकील सेलीम रहमान यांनी दावा केला की हसीन जहाँ स्वतः व्यावसायिक फॅशन मॉडेल म्हणून काम करून स्थिर उत्पन्न मिळवत असल्याने, त्या उच्च पोटगीची मागणी न्याय्य नाही. अखेर दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कनिष्ठ न्यायालयाने सोमवारी मासिक पोटगीची रक्कम १.३० लाख रुपये निश्चित केली. कोर्टाच्या निर्देशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना हसीन जहाँने दावा केला की मासिक पोटगीची रक्कम जास्त असती तर तिला दिलासा मिळाला असता. वृत्त दाखल करेपर्यंत या घटनेवर भारतीय वेगवान गोलंदाजाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

मात्र, हसीन जहाँ या रकमेवर खूश नाही. कारण तिने महिन्याला १० लाख रुपयांची मागणी केली होती. २०१८ मध्ये हसीन जहाँने १० लाख रुपये मासिक पोटगीची मागणी करणारी कायदेशीर याचिका दाखल केली होती. हसीन जहाँने याचिकेत म्हटले होते की, तिला वैयक्तिक खर्चासाठी ७ लाख रुपये आणि मुलीच्या संगोपनासाठी दरमहा ३ लाख रुपये पोटगी हवी आहे. हसीन जहाँ आता या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील करू शकते.

हेही वाचा: IND vs NZ: रोहित-विराटचा टी२० मधून कायमचा पत्ता कट? न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी राहुल द्रविडने केला खुलासा

२०१८ मध्ये शमीच्या आयुष्यात भूकंप आला होता

२०१८ मध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या वैयक्तिक आयुष्यात भूकंप आला होता. शमीची पत्नी हसीन जहाँने या दिग्गज व्यक्तीवर घरगुती हिंसाचार, मॅच फिक्सिंग, हुंडाबळी असे गंभीर आरोप केले होते. यानंतर मोहम्मद शमीने पत्नीच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले होते. नंतर शमी आणि हसीन जहाँ वेगळे झाले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आशिया चषकात भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर, हसीन जहाँने सोशल मीडियावर षटकार मारून भारताचा विजय मिळवणाऱ्या हार्दिक पांड्याचा फोटो शेअर केला आणि शमीवर हल्ला केला.

हेही वाचा: फुटबॉल सामन्यात प्रथमच पांढऱ्या कार्डचा वापर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपांवर स्पष्टीकरण देताना शमी म्हणाला होता, “हसीन आणि तिचे कुटुंबीय सांगत आहेत की ते सर्व मुद्द्यांवर बसून बोलू. पण त्यांना कोण भडकावत आहे हे मला माहीत नाही. आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जे काही चालले आहे ते पूर्णपणे खोटे आहे. माझ्याविरुद्ध काही मोठे षडयंत्र रचले जात आहे. माझी बदनामी करण्याचा किंवा करिअर संपवण्याचा हा प्रयत्न आहे. देशाशी गद्दारी करण्यापेक्षा मरणे पसंत करेन.”