Mohammed Siraj Clean Bowled Chris Woakes Video: इंग्लंड संघाने मँचेस्टर कसोटीत कमालीची फटकेबाजी केली आहे. इंग्लंडच्या टॉप-४ फलंदाजांनी अर्धशतकं झळकावत भारताच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. जो रूटने तर शतक झळकावत १५० धावांची विक्रमी खेळी केली आणि अनेक विक्रमांना गवसणी घातली. मोहम्मद सिराजने रूटला चांगली गोलंदाजी केली होती. अखेरीस सिराजने वोक्सला क्लीन बोल्ड करत पहिली विकेट मिळवली.
भारताने पहिल्या डावात ३५८ धावा केल्या होत्या. या प्रत्युत्तरात इंग्लंडने कमालीची फलंदाजी करत तिसऱ्या दिवशी ५०० धावांचा टप्पा पार केला आहे. यासह इंग्लंडने १५० अधिक धावांची आघाडी आतापर्यंत मिळवली आहे. इंग्लंडच्या वरच्या फलंदाजी फळीने शानदार फलंदाजी केल्याने इंग्लंडचा संघ सामन्यातून पुढे आहे.
जसप्रीत बुमराहने जॅमी स्मिथला बाद केल्यानंतर काहीच षटकांनंतर सिराजने त्याची पहिली विकेट मिळवली. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांना स्टम्पिंग आणि झेलबाद होत विकेट मिळाल्या, पण सिराजने फलंदाजाला क्लीन बोल्ड करत विकेट मिळवली. सिराजच्या १३०व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर ख्रिस वोक्स बोल्ड झाला.
सिराजचा चेंडूने योग्य लाईनवर टाकला आणि तो चेंडू खूप राहिला. वोक्स डिफेन्स करायला गेला आणि चेंडू बॅटला लागून टप्पा पाडून स्टम्पवर आदळला आणि बेल्स विखुरल्या. सिराजने त्याची पहिली विकेट मिळवताच Siuuu सेलिब्रेशन करत आनंद साजरा केला. Siuu हे सेलिब्रेशन फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो करतो आणि सिराज त्याचा चाहता असल्याने तो विकेट मिळाल्यानंतर हे सेलिब्रेशन करतो.
भारताकडून फिरकीपटूंनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडने तिसऱ्या दिवशी ७ विकेट्स गमावल्या आहेत. त्यापैकी रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने २-२ विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, अंशुल कंबोज आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी १-२ विकेट घेतली आहे.
इंग्लंडने तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस ७ बाद ५४४ धावा केल्या आहेत. यासह इंग्लंडकडे आता मँचेस्टर कसोटीत १८६ धावांची आघाडी आहे. सध्या बेन स्टोक्स ७० धावा तर लियाम डॉसन २१ धावा करत नाबाद परतले आहेत.