WTC 2023 Final India vs Australia : मोहम्मद सिराजने फक्त १९ कसोटी सामने खेळून करिअरमध्ये ५० विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इनिंगमध्ये सिराजने ४ विकेट्स घेतल्या. सिराजने नेथन लायनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवल्यानंतर सिराजच्या नावावर त्याच्या कसोटी करिअरमधील ५० विकेट्स पूर्ण झाल्याची नोंद झाली. भारताकडून ५० विकेट्स घेणाऱ्या क्लबमध्ये सिराज ४२ वा गोलंदाज बनला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये सिराजने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात उस्मान ख्वाजा, ट्रेविस हेड, पॅट कमिन्स आणि लायनला बाद केलं. तर दुसऱ्या इनिंगमध्ये आतापर्यंत सिराजने एक विकेट घेतला आहे. सिराजने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण ५२ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

सिराजच्या वेगवान माऱ्यापुढं कांगांरु फलंदाजांची पुरती दमछाक झाली असल्याचं या फायनलच्या सामन्यादरम्यान पाहायला मिळालं. इंग्लंडमध्ये सिराजने आतापर्यंत २३ विकेट्स घेतल्या आहेत. सिराजच्या ५२ कसोटी विकेट्समध्ये आतापर्यंत ३९ विकेट्स विदेशात खेळताना मिळाल्या आहेत. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात सिराजने भेदक गोलंदाजी करून धमाका केला आहे. ऑस्ट्रेलियात सिराजने १३ विकेट्स घेतल्या आहेत. तर दक्षिण आफ्रिकामध्ये ३ विकेट्स घेण्यात त्याला यश आलं आहे.

नक्की वाचा – WTC Final 2023 : रवींद्र जडेजाने रचला इतिहास, ‘या’ दिग्गज खेळाडूचा विक्रम मोडून इंग्लंडमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिराजने भारताच्या बाहेर १२ कसोटी सामन्यांमध्ये एकूण ४० विकेट्स घेण्याची कमाल केली आहे. तर भारतात ६ कसोटी सामन्यांमध्ये ७ विकेट्स घेतल्या आहेत. न्यूट्रल वेन्यूवर सिराजच्या नावावर आतापर्यंत ५ विकेट्सची नोंद आहे.या फायनलमध्ये भारताने पहिल्या इनिंगमध्ये २९६ धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या इनिंगमध्ये दिवस संपेपर्यंत ३ विकेट्स गमावत १२३ धावा केल्या होत्या. आता या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांना कमाल करून ऑस्ट्रेलियाला सर्वबाद करण्याबाबत विचार करावा लागेल.