Mohammed Siraj Ben Stokes Wicket: भारत वि. इंग्लंड यांच्यात पहिल्या कसोटीत अटीतटीची चुरस पाहायला मिळत आहे. इंग्लंडचे फलंदाज झटपट धावा करत भारताला बॅकफूटवर टाकण्याचा प्रयत्न करत आहे. पहिल्या दिवशी बुमराहने तर दुसऱ्या दिवशी प्रसिधने संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. पण सिराजच्या खात्यात एकही विकेट नव्हती. अखेरीस सिराजने बेन स्टोक्सला आपल्या जाळ्यात अडकवत मोठी विकेट मिळवून दिली.

स्टोक्सची विकेट गमावली तेव्हा इंग्लंडने पहिल्या डावात २७६ धावा केल्या होत्या. जेव्हा स्टोक्स सिराजच्या चेंडूवर बाद झाला तेव्हा चांगलाच वैतागला होता आणि रागाच्या भरात त्याने त्याची बॅट हवेत फेकली.

तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स फलंदाजीसाठी आला तेव्हा इंग्लंडने त्यांच्या पहिल्या डावात २२५ धावा केल्या होत्या. यानंतर, स्टोक्सने हॅरी ब्रूकसह डाव पुढे नेला ज्यामध्ये तो जलद धावा काढण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान, दरम्यान मोहम्मद सिराजने त्याच्या षटकात बेन स्टोक्सला राउंड द विकेट गोलंदाजी केली. स्टोक्स सिराजचा चेंडू समजू शकला नाही आणि विकेट गमावून बसला.

सिराजने बेन स्टोक्सला ऑफ स्टंपचा बाहेर जाणारा चेंडू टाकला आणि नेहमीप्रमाणे स्टोक्सने त्या चेंडूवर बॅट फिरवली. पण चेंडू बॅटची कड घेत थेट विकेटकिपर ऋषभ पंतच्या हातात पोहोचला आणि भारताला मोठी विकेट मिळाली. बाद झाल्यानंतर स्टोक्सने प्रथम त्याची बॅट हवेत फेकली आणि नंतर ती पायावर आदळली.

बेन स्टोक्सने २० धावांवर आपली विकेट गमावली. स्टोक्सला त्याच्या डावात फक्त तीन चौकार मारता आले. स्टोक्स सध्या कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीच्या अतिशय खराब फॉर्मशी झुंजत आहे, ज्यामध्ये गेल्या १० डावांमध्ये त्याला एकही अर्धशतक करता आलेले नाही. तर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये २ वर्षे झाली एकही शतक झळकावलेले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय संघाने अखेरीस इंग्लंडला ४६५ धावांवर सर्वबाद केले. यामध्ये जसप्रीत बुमराहने ५ विकेट्स घेत इंग्लिश संघासाठी डोकेदुखी ठरला. यासह भारतीय संघाने पहिल्या डावात ६ धावांची आघाडी मिळवली. बुमराहने ५ तर प्रसिध कृष्णाने ३ विकेट्स तर सिराजने २ विकेट्स घेतले.