पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक मोइन खानची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने निवडसमिती प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. ४१ वर्षीय मोइन सगळ्यात तरुण सगळ्यात तरुण निवड समिती प्रमुख ठरला आहे.चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील पाकिस्तान संघाच्या सुमार कामगिरीनंतर निवडसमिती प्रमुख इक्बाल कासिम यांनी या पदाचा राजीनामा दिला होता.  मोइनने ६९ कसोटी आणि २१९ एकदिवसीय सामन्यांत पाकिस्तानचे प्रतिनिधित्त्व केले आहे. २०१५ विश्वचषकासाठी संघबांधणी करणे हे उद्दिष्ट असल्याचे मोइनने सांगितले. ‘क्रिकेटवेडय़ा देशात निवडसमितीचे प्रमुखपद सांभाळणे अवघड आहे, मात्र पाकिस्तानसाठी खेळताना मी सर्वोत्तम प्रदर्शनासाठी प्रयत्नशील असे, निवडसमिती प्रमुख म्हणूनही माझी हीच भूमिका असेल’, असे मोइनने सांगितले.