भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची पत्नी साक्षी धोनी हिने आपल्या जीवाला धोका असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. जीवाला धोका असल्याकारणाने स्वतःजवळ पिस्तूल बाळगण्याची परवानगी द्यावी, असे तिने म्हटले आहे.

साक्षीने पिस्तूल किंवा रिव्हॉल्व्हर जवळ बाळगण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज संबंधित अधिकारी वर्गाला केला आहे. या अर्जात तिने आपल्या जीवाला धोका असल्याची शक्यता वर्तवली आहे. ‘मी अनेकदा घरी एकटी असते. घराबाहेर पडतानादेखील बहुतांश वेळी मी एकटीच असते. त्यामुळे माझ्या जीवाला धोका असळण्याची शक्यता आहे, असे तिने अर्जात नमूद केले आहे. या कारणास्तव शस्त्र बाळगण्याच्या परवाना कायद्याअंतर्गत साक्षीने पिस्तूल अथवा ०.३२ची रिव्हॉल्व्हर बाळगण्याची परवानगी संबंधित विभागाकडे मागितली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१० मध्ये धोनीलादेखील या परवान्यानांतर्गत शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्यात आला आहे. ९ मिमी. पिस्तूल बाळगण्याचा परवाना त्याच्याकडे आहे. दरम्यान, झारखंड गृह विभागाने धोनीचा अर्ज डिसेंबर २००८मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवला होता. मात्र, त्या संबंधी काही अधिक माहितीची गरज असल्याचे सांगत त्यावर परवानगी मिळण्यास उशीर झाला होता.