कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुंबई शहरने दुहेरी मुकुट पटकावला. मुंबईच्या कुमारी संघाचे हे सलग दुसरे जेतेपद आहे.
कुमारी गटाच्या अंतिम लढतीत मुंबई शहरने पुण्यावर २०-१७ अशी ३ गुणांनी मात केली. सोनाली शिंगटे आणि तेजस्विनी पोटे यांच्या चतुरस्र खेळाच्या जोरावर मुंबईने मध्यंतराला १४-९ अशी आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर पुण्याने आपला खेळ उंचावला आणि आगेकूच करण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपुराच ठरला. मुंबई शहर संघाला चंदन सखाराम पांडे चषकाने गौरवण्यात आले. कुमार गटाच्या अंतिम लढतीत मुंबई शहरने रायगडचा २०-९ असा धुव्वा उडवला. मध्यंतराला मुंबई शहरकडे ७-५ अशी आघाडी होती. मयूर शिवतरकर आणि दुर्वेश पाटील यांनी मुंबईकडून शानदार खेळ केला. मुंबई शहरला नारायण नागू पाटील चषकाने सन्मानित करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jun 2014 रोजी प्रकाशित
कबड्डी : मुंबई शहरला दुहेरी मुकुट
कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुंबई शहरने दुहेरी मुकुट पटकावला. मुंबईच्या कुमारी संघाचे हे सलग दुसरे जेतेपद आहे.
First published on: 07-06-2014 at 05:18 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai kabaddi team double win