मुंबईने १९-वर्षांखालील कुचबिहार करंडक स्पर्धेत कर्नाटवर एक डाव आणि १२२ धावांनी मात केली. कर्नाटकच्या पहिल्या डावातील १८० धावांना उत्तर देताना अरमान जाफरच्या नाबाद २१८ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने ४ बाद ५०६ धावांवर डाव घोषित केला. अरमानने या द्विशतकी खेळीत २६ चौकार आणि चार षटकार लगावले. त्यानंतर मुंबईने कर्नाटकचा दुसरा डाव २०४ धावांवर गुंडाळत मोठा विजय साकारला. मुंबईकडून मिनाद मांजरेकर आणि शम्स
मुलानी यांनी प्रत्येकी चार बळी मिळवत विजयात मोलाचा वाटा उचलला.