Muneeba Ali Controversial Run Out Video: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पाक संघाची सलामीवीर मुनीबाच्या विकेटवरून मैदानावर गदारोळ पाहायला मिळाला. महिला वनडे वर्ल्डकप सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर भारताने फलंदाजीत ठराविक अंतराने विकेट्स गमावले असले तरी २४७ धावा केल्या. यानंतर प्रत्युत्तरात पाकिस्तानने सुरूवातीलाच विचित्ररित्या बाद झाली. नेमकं काय घडलं; पाहूया.

भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना २४७ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून सर्व फलंदाजांनी ३०-३५ धावांचं योगदान दिलं. पाकिस्तानच्या गोलंदाजीपुढे भारताने ठराविक अंतरावर विकेट्स गमावल्या. पण अखेरच्या षटकांमध्ये ऋचा घोष चौकार-षटकारांचा पाऊस पाडला आणि संघाला २४७ धावांपर्यंत नेऊन पोहोचवलं.

दीप्ती शर्माचा थ्रोवर कशी बाद झाली मुनीबा अली?

भारताने दिलेल्या २४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. पहिल्या षटकापासूनच टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दबाव कायम ठेवला आहे. क्रांती गौडच्या चौथ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर संघाने पायचीत झाल्याचं अपील केलं. पण चेंडू लेग स्टंपच्या बाहेर तर नाही ना पिच झाला, अशी शंका होती. ऋचाने मात्र बाद असल्याची खात्री दाखवली तरी भारताने रिव्ह्यू घेतला नाही.

क्रांतीचा तो चेंडू विकेटच्या मागे गेला आणि दीप्ती शर्माने चेंडू पकडत लगेच स्ट्रायकर एन्डच्या दिशेने थ्रो केला. तेव्हा मुनीबा क्रीजच्या बाहेर होती आणि तिचं लक्ष नव्हतं. दीप्ती शर्माचा थ्रो येऊन सरळ विकेटवर बसला. टीम इंडियाच्या खेळाडूंनी अपील केलं, पण मैदानावरील पंचांनी नाबाद दिलं व तिसऱ्या पंचांची मदत घेतली. रिप्लेमध्ये मुनीबाने बॅट क्रीजच्या आत नेली आणि पुन्हा वर उचलेली दिसली. रनआउट तपासताना लक्षात आलं की चेंडू स्टंपला लागला तेव्हा बॅट हवेत होती आणि शेवटी आउट दिलं गेलं.

एकाच चेंडूवर पाकिस्तानची सलामीवीर दोन वेळा बाद

मुनीबा अलीला धावबाद दिल्यानंतर फातिमा सना चौथ्या पंचाशी बोलताना दिसली, तर मुनीबा बाजूलाच उभी होती यावरून मोठा वाद निर्माण झाला. भारतीय खेळाडू जल्लोष करत होती. पण मुनीबा मात्र दुर्देवी ठरली, कारण ती जवळजवळ क्रीजजवळ पोहोचली होती, पण नेमकं त्या क्षणी बॅट हवेत होती आणि चेंडू स्टंपला लागला. त्यामुळे आउट दिलं गेलं.

महत्त्वाचं म्हणजे, क्रिकेटच्या नियमाप्रमाणे जोपर्यंत चेंडू डेड होत नाही, तोपर्यंत फलंदाजाने क्रीजच्याआतमध्ये राहणं गरजेचं असतं. याशिवाय भारताने जर रिव्ह्यू घेतला असता तर मुनीबा सुरूवातीला पायचीत देखील झाली होती. याचाच अर्थ मुनीबा एकाच चेंडूवर दोन वेळा बाद झाली.