Musheer Khan’s double century against Baroda : मुशीर खानने रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना द्विशतक झळकावले आहे. सर्फराझ खानच्या धाकट्या भावाने बडोद्याविरुद्ध खेळल्या जात असलेल्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत शानदार खेळी करत मुंबईला नवसंजीवनी दिली. मुशीरने १८ चौकार मारत द्विशतक पूर्ण केले. तो मुंबईकडून द्विशतक झळकावणारा दुसरा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. त्याच्या अगोदर हा पराक्रम वसीम जाफरच्या नावावर आहे.

वसीम जाफरने १९९६-९७ मध्ये १८ वर्ष आणि २६२ दिवसांचा असताना द्विशतक झळकावले होते. आता मुशीर खानने १८ वर्ष आणि ३६२ दिवसांचा असताना द्विशथक झळकावले आहे. एकीकडे मोठा भाऊ सर्फराझ इंग्लंडविरुद्ध भारतासाठी चमकतोय, तर दुसरीकडे धाकट्या भावाने प्रथम श्रेणीत शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे मुंबईने संघाने पहिल्या डावात १४०.४ षटकांत सर्वबाद ३८४ धावांचा डोंगर उभारला. मुशीर खानने नाबाद २०३ धावांचे योगदान दिले.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Kolkata Knight Riders Vs Lucknow Supergiants Mathc Highlights in marathi
KKR vs LSG : कोलकाताचा ऐतिहासिक विजय! लखनऊचा ८ विकेट्सनी उडवला धुव्वा
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: शुबमन गिलच्या नावे आयपीएलमध्ये अजून एक मोठा रेकॉर्ड; रोहित, विराट, रहाणे सर्वांनाच टाकलं मागे

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले द्विशतक –

मुशीर खानने ३५७ धावांचा सामना करताना १८ चौकारांच्या मदतीने २०३ धावा केले. हे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले द्विशतक आहे. तसेच हार्दिक तमोरे ५७ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर पृथ्वी शॉने ३३ धावा केल्या. यानंतर मुंबईच्या एकाही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही. बडोद्याकडून भार्गव भट्टने सर्वाधिक सात विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवया निनाद रथवाने तीन विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – WPL 2024 : कोण आहे सजीवन सजना? जिच्या एका षटकाराने वेधले सर्व जगाचे लक्ष

मुशीरने शानदार खेळी करत मुंबईला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. मुंबईने चौथी विकेट ९० धावांवर गमावली आणि त्यानंतर १४१ धावांवर पाचवी विकेट पडली. मात्र यादरम्यान मुशीर खानने एक बाजूला सांभाळताना संघाला मोठी धावसंख्या गाठण्यास मदत केली. मुशीरची ही खेळी मुंबईला विजयाकडे घेऊन जात असल्याचे दिसते. एकेकाळी वाईट स्थितीत असलेली मुंबई आता मुशीरच्या द्विशतकानंतर विजयाचा प्रबळ दावेदार दिसत आहे.

हेही वाचा – Ranji Trophy : ‘चांगली कामगिरी केली आहेस, पण…’ पहिले शतक झळकावण्यापूर्वी सर्फराझने मुशीरला काय सल्ला दिला होता?

बडोद्याविरुद्धचा उपांत्यपूर्व सामना वगळता मुशीरने केवळ तीन प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. मुशीरने डिसेंबर २०२२ मध्ये प्रथम श्रेणीत पदार्पण केले. द्विशतकापूर्वी मुशीरने ३ सामन्यांच्या ५ डावात फलंदाजी करताना १९.२० च्या सरासरीने केवळ ९६ धावा केल्या होत्या. पण आता कारकिर्दीतील चौथ्या प्रथम श्रेणी सामन्यात मुशीरने ऐतिहासिक खेळी खेळली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बडोद्याने २ गडी गमावून १३७धावा केल्या होत्या. बडोदा संघ सध्या २५७ धावांनी पिछाडीवर आहे.

मध्य प्रदेशविरुद्ध आंध्र प्रदेशचा डाव १७२ धावांवरच आटोपला –

मध्य प्रदेशने पहिल्या डावात २३४ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात आंध्र प्रदेशचा डाव केवळ १७२ धावांवरच आटोपला. आंध्र प्रदेशकडून करण सिंदेने सर्वाधिक ३८ धावा केल्या. त्याच्याशिवाय कर्णधार रिकी भुईने ३२ धावांचे योगदान दिले. हनुमा विहारी (१४) मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. मध्य प्रदेशने आपल्या दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता २१ धावा केल्या असून त्यांची एकूण आघाडी ८३ धावांची झाली आहे.

हेही वाचा – IND vs ENG : दुसऱ्या दिवसावर इंग्लंडचे वर्चस्व! भारताने २१९ धावांवर गमावल्या ७ विकेट्स, शोएब बशीर ठरला काळ

रिकी भुईने अमोल मजुमदारचा विक्रम मोडला –

भुईने या मोसमात सध्या ८१.१८ च्या सरासरीने ८९३ धावा केल्या आहेत. तो आता आंध्र प्रदेशकडून एकाच रणजी मोसमात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने अमोल मजुमदारचा (८६८ धावा, २०१२-१३) विक्रम मोडला आहे.

तमिळनाडूने सौराष्ट्रविरुद्ध घेतली आघाडी –

तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत तामिळनाडू क्रिकेट संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ६ गडी गमावून ३०० धावा केल्या आहेत. सध्या विजय शंकर आणि मोहम्मद अली क्रीजवर आहेत. तामिळनाडूची आघाडी सध्या ११७ धावांची आहे. सौराष्ट्रकडून अजित रामने ३ बळी घेतले. तत्पूर्वी, सौराष्ट्र संघाला पहिल्या डावात केवळ १८३ धावा करता आल्या.