India vs England, 4th Test Match Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना रांचीत खेळला जात आहे. या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताची धावसंख्या ७ विकेट्स गमावून २१९ धावा केल्या आहेत. अशाप्रकारे भारतीय संघ पहिल्या डावाच्या आधारे इंग्लंडपेक्षा १३४ धावांनी मागे आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ध्रुव जुरेल आणि कुलदीप यादव नाबाद परतले. ध्रुव जुरेल २९ धावा करून क्रीजवर आहे. तर, कुलदीप यादव १७ धावा करून खेळत आहे. इंग्लंडकडून शोएब बशीरने सर्वाधिक चाक विकेट्स घेतल्या.
भारताचा पहिला डाव –
भारतीय संघाची सुरुवात खराब झाली कर्णधार रोहित शर्मा दोन धावा करून बाद झाला.. रोहितला अँडरसनने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर शुबमन गिलने यशस्वी जैस्वालसोबत ८२ धावांची भागीदारी केली. रजत पाटीदार पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि केवळ १७ धावा करू शकला. रवींद्र जडेजा १३ धावा करून बाद झाला. शुबमन, रजत आणि जडेजा यांना शोएब बशीरने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दरम्यान, यशस्वीने कसोटी कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. मात्र, ७३ धावा करून तो बशीरचा बळी ठरला. सरफराज १४ धावा करून बाद झाला, तर अश्विन एक धाव करून बाद झाला. या दोघांनाही हार्टलेने बाद केले.
हेही वाचा – IND vs ENG 4th Test : ‘इसको हिंदी नहीं आती’; सर्फराझ खानने खिल्ली उडवताच, शोएब बशीरने दिले चोख प्रत्युत्तर
यशस्वी जैस्वालने रोहित शर्माला टाकले मागे –
रांची कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात यशस्वी जैस्वालने षटकार ठोकताच, इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेतील हा त्याचा २३वा षटकार ठरला. या षटकारासह, तो कसोटीत एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. याआधी या क्रमांकावर कर्णधार रोहित शर्मा उपस्थित होता, ज्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत आतापर्यंत २२ षटकार मारले होते, पण इंग्लंडविरुद्ध २३ षटकार मारून यशस्वीने त्याला तिसऱ्या क्रमांकावर ढकलले आणि स्वतः दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. भारताकडून एकाच संघाविरुद्ध कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम सध्या सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, ज्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २५ षटकार ठोकले होते.
एका संघाविरुद्ध कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणारे भारतीय फलंदाज –
२५ षटकार – सचिन तेंडुलकर – विरुद्ध ऑस्ट्रेलिया
२३ षटकार – यशस्वी जैस्वाल – विरुद्ध इंग्लंड
२२ षटकार – रोहित शर्मा – विरुद्ध दक्षिण आफ्रिका वि
२१ षटकार – कपिल देव – विरुद्ध इंग्लंड
२१ षटकार – ऋषभ पंत – विरुद्ध इंग्लंड