भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात नागपूर येथे खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील खेळपट्टी वाईट दर्जाची असल्याचे आयसीसीकडून ( आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती) मंगळवारी जाहीर करण्यात आले. ‘आयसीसी’ला सादर केलेल्या अहवालात सामनाधिकारी जेफ क्रो यांनी खेळपट्टीच्या दर्जाबाबत चिंता व्यक्त केली आहे. जेफ क्रो यांच्या या अहवालामुळे भारताच्या मालिका विजयाला गालबोट लागले आहे. भारताने या कसोटीत दक्षिण आफ्रिकेवर १२४ धावांनी विजय मिळवला होता. नागपूर कसोटी सुरू झाल्यापासूनच जामठाच्या खेळपट्टीवर दोन्ही संघाच्या फलंदाजांना टिकाव धरणे अवघड जात होते. त्यामुळे खेळपट्टीच्या दर्जाबाबत शंका व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान, आयसीसीने हा अहवाल बीसीसीआयला ( भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) पाठवला असून पुढील १४ दिवसांत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Dec 2015 रोजी प्रकाशित
नागपूर कसोटीतील खेळपट्टी खराब असल्याचा सामनाधिकाऱ्यांचा अहवाल
भारताने या कसोटीत दक्षिण आफ्रिकेवर १२४ धावांनी विजय मिळवला होता.
Written by रोहित धामणस्कर
Updated:

First published on: 01-12-2015 at 18:13 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur pitch rated as poor by icc match referee